दिनांक 18 December 2017 वेळ 3:03 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » दारूबंदीकरिता कोळगाव एकवटले

दारूबंदीकरिता कोळगाव एकवटले

प्रतिनिधीDARUBANDI
पालघर, दि. 12 : दारूचे दुष्परिणाम सर्वसामान्य जनतेला आता जाणवू लागलेत. त्यामुळे दारूबंदीकरिता महिलांसोबतच पुरुषांचाही पुढाकार मोठ्याप्रमाणात वाढू लागल्याचे येथील कोळगाव वंकास पाड्यातील नागरिकांनी दारूबंदी करून दाखवून दिले.
तालुक्यातील कोलगाव वंकासपाड्यात दारुबंदी करावी म्हणून महिलांनी पुढाकार घेतला. महिलांच्या या सूचनेला गावातील ज्येष्ठ नागरिक, पोलिस पाटील, गाव तंटामुक्त समितीचे सदस्य यांनी पाठिंबा दर्शवत पोलिस प्रशासनाशी संपर्क साधला. पोलीसांनीही गावाच्या दारूबंदीच्या निर्णयाचे स्वागत करत त्यांना पाठबळ देण्याची भूमिका बजावली. या गावात दारूबंदीचा निर्णय सहमतीने व्हावा म्हणून पालघर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण काबाडी यांनी गावात शुक्रवारी एक बैठक घेऊन लोकांचे अधिक प्रबोधन केले. यानंतर संपूर्ण गावाने एकमताने दारुबंदिचा निर्णय घेतला.
यावेळी गावाच्या सरपंच मिथिला संखे, पोलिस पाटील चिरंतन संखे, गाव तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष परशुराम पाटील, अन्य तंटामुक्ती समितीचे सदस्य, नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

comments

About Rajtantra

Scroll To Top