दिनांक 23 January 2018 वेळ 3:18 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » मोखाडा : क्रांतीकारक राघोजी भांगरे जयंतीनिमित्ताने वाकडपाड्यात कोळी (महादेव) समाज एकवटला

मोखाडा : क्रांतीकारक राघोजी भांगरे जयंतीनिमित्ताने वाकडपाड्यात कोळी (महादेव) समाज एकवटला

प्रतिनिधी :
खोडाळा, दि. 12 : धनKOLI SAMAJगर समाज आरक्षणासाठी घुसखोरी करीत आहे. त्यासाठी सर्व आदिवासी समाज बांधवांनी एका झेंड्याखाली येऊन सामाजिक एकोपा जोपासला पाहिजे व आपला हक्क अबाधित ठेवला पाहिजे, असे स्पष्ट प्रतिपादन माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी केले आहे. मोखाडा तालुक्यातील वाकडपाडा येथे आद्यक्रांतीकारक विर राघोजी भांगरे यांच्या 212 व्या जयंतीचे औचित्य साधुन कोळी (महादेव) समाज बांधवांसाठी समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कोळी समाजबांधवांना उद्देशून ते बोलत होते.
एकीकडे सर्व समाज एकवटत असताना आदिवासी समाज मात्र विखुरलेला आहे. आज यानिमित्ताने सर्वच आदिवासी बांधवांनी एकत्र येण्याची गरज असुन अशा प्रकारचे प्रबोधनात्मक मेळावे ठिकठिकाणी होणे आवश्यक आहे, असे मत पिचड यांनी व्यक्त केले असून त्यासाठी तरूणांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. आदिवासी समाजाचे सर्व्हेक्षण करण्याचे काम सरकारने कुठल्यातरी तिर्‍हाईत संस्थेला दिलेले आहे. त्यावरून आरक्षणाचे धोरण स्पष्ट होणार असेल तर आपली एकी ही आपला न्याय्य हक्क अबाधित राखणार असल्याने सर्वच आदिवासी बांधवांनो एक व्हा, असे आवाहन पिचड यांनी समूदायाला केले आहे.
या समाजप्रबोधन मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मोखाडा पंचायत समितीचे सभापती प्रदीप वाघ होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे पालघर जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा, आदिवासी विकास महामंडळाचे संचालक देवीदास पाटील, इगतपुरीचे माजी आमदार शिवराम झोले, ज्येष्ठ नेते मधुकर डामसे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप गाटे, दिलीप पटेकर, रघुनाथ पवार यांच्यासह जव्हार, मोखाडा, विक्रमगड, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यातून महादेव कोळी समाजबांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होता.

comments

About Rajtantra

Scroll To Top