दिनांक 23 January 2018 वेळ 3:21 AM
Breaking News
You are here: Home » महा माहिती » पत्रकार हर्षद पाटील यांचा गौरव

पत्रकार हर्षद पाटील यांचा गौरव

05वाडा ता. २० :  शिवजयंती निमित्ताने भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाच्या वाडा शहर शाखेच्या वतीने रविवारी ( दि. १९ ) वाड्यातील गणेश मैदान येथे सायंकाळी शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी  अनेक स्फूर्तीगीते, पोवाडे सादर करत ” वीर झुंझला रणी ” हा  शिवगीतांचा जागर चांगलाच रंगला. यावेळी पत्रकार हर्षद पाटील यांचा गौरव देखील करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या  पुतळ्यासह मेघडंबरीची किशोर सोनटक्के यांनी साकारलेली प्रतिकृती व आशिष साळवी यांनी कार्यक्रमा दरम्यान साकारलेले छत्रपतींचे शिल्प हे या कार्यक्रमात खास आकर्षण ठरले.
शिवपूजनानंतर झालेल्या प्रथम कलामंच, मुंबई प्रस्तुत ` वीर झुंजला रणी ´ हा शिवगीतांच्या बहारदार कार्यक्रमास वाड्यातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. या शिवगीतांच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या वाड्यातील मयूर आळशी यांच्या सुमधुर गायनाने उपस्थितांची दाद मिळविली.    याप्रसंगी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबाजी काठोळे, जिल्हाध्यक्ष आमदार पास्कल धनारे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुरेखा थेतले, वाडा तालुकाध्यक्ष संदीप पवार, पंचायत समितीच्या उपसभापती माधुरी पाटील, तसेच भाजपच्या जेष्ठ पदाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयेश शेलार यांनी केले.

comments

About Rajtantra

Scroll To Top