दिनांक 23 January 2018 वेळ 3:20 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » स्वयंप्रेरणेने तरुणांनी केली बंधार्‍याची दुरुस्ती

स्वयंप्रेरणेने तरुणांनी केली बंधार्‍याची दुरुस्ती

प्रतिनिधी
पालघर, दि.5 : तालुक्यातील माBANDHARA DURUSTIकुणसार बंधार्‍याला लागलेल्या गळतीने हजारो लिटर पाणी वाहून जावू लागल्याचे निदर्शनास येताच सह्याद्री मित्र परिवाराच्या तरुणांनी पुढाकार घेत श्रमदान करून बंधार्‍याची गळती थांबवली. या तरुणांनी बंधार्‍याची दुरुस्ती शासन करेल याची वाट न पाहता केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
माकुणसार गावचे माजी सरपंच विवेक राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी मालजुई बंधार्‍याला गळती लागून हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. बांधारा काही अंशी फुटल्याने त्यातून हजारो लिटर गोडे पाणी वाहून गेले तर अल्पावधीतच बंधार्‍याचे पात्र कोरडे पडण्याची भीती त्यांनी या तरुणांपुढे व्यक्त केली. त्यानंतर सह्याद्री मित्र परिवारातील तरुणांनी विलंब न लावता रविवारी (दि. 5) तातडीने श्रमदान करण्याचा निर्णय घेतला व दिवसभर राबून बंधार्‍याची गळती थांबवली आहे. या तरुणांनी स्वयंप्रेरणेने श्रमदान करून बंधार्‍याची दुरुस्ती केल्याने संपूर्ण गावकर्‍यांनी त्यांचे कौतुक केले.
हा बांधारा पाणी अडवा, पाणी जिरवा या संकल्पनेतून साकारण्यात आला असून याचे पाणी साधारणतः एप्रिलपर्यंत राहते. आज हा बांधारा दुरुस्त केला नसता तर जानेवारीमध्येच पाणीसाठा संपला असता. याच बांधार्‍यामुळे परिसरातील विहिरी आणि बोअरवेलना अगदी मे महिन्यापर्यंत गोड्या पाण्याची उपलब्धता राहते. त्यामुळे सह्याद्री मित्रांनी आज केलेली बांधार्‍याची दुरुस्ती महत्त्वपूर्ण असून सह्याद्री मित्र परिवारातील विवेक राऊत, दिपक पाटील, राकेश पाटील, भुपेश म्हात्रे, सर्वेश पाटील, निकेत पाटील आणि गौरव राऊत यांनी विशेष मेहनत घेतली.

comments

About Rajtantra

Scroll To Top