दिनांक 23 January 2018 वेळ 3:20 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » वंचितांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी कायम संघर्षाची कास धरा श्रमजीवीच्या वर्धापनदिनी विवेक पंडितांचे कार्यकर्त्यांना आवाहन

वंचितांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी कायम संघर्षाची कास धरा श्रमजीवीच्या वर्धापनदिनी विवेक पंडितांचे कार्यकर्त्यांना आवाहन

प्रतिनिधी
पालघर, दि. 5 : आदिवासी, गरीब वंचितांच्या जीवनामध्ये बदल व्हावा, त्यांचं शोषण थांबावं म्हणून श्रमजीवी संघटना निर्माण झाली. संघटनेच्या पहिल्या पीढीने प्रचंड संघर्ष केला. असंख्य हल्ले पचवले आणि संघर्षातून श्रमजीवी संघटना उभी राहीली असून नव्या पीढीच्या कार्यकर्त्यांनी वंचितांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडविण्यासाठी इथल्या व्यवस्थेविरोधात कायम संघर्षाची कास धरावी, असे आवाहन श्रमजीवी संघटनेचे संस्थापक माजी आमदार विवेक पंडित यांनी संघटनेच्या वर्धापनदिनी कार्यकर्त्यांनी केले.
पालघर, ठाणे जिSHRAMJIVI VARDHAPAN DINल्ह्यासह सामाजाच्या उत्थानासाठी श्रमजीवी संघटना गेली तीन दशके कार्यरत आहे. संघटनेचा 34 वा वर्धापनदिन दिन रविवारी (दि. 5) संपूर्ण जिल्ह्यात साजरा करण्यात आला. वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना संदेश देताना पंडितांनी वरील आवाहन केले. ते पुढे म्हणाले, संघटना शोषित- वंचितांच्या प्रश्‍नांवर, त्यांच्या गुलामगिरीविरोधात झगडली. ज्या काळात संघटनेने सावकार व जमिनदारांच्या विरोधात लढा उभारला तो काळ खूप संघर्षाचा आहे. त्याकाळातील आदिवासी समाजाची सामाजिक परिस्थिती आजच्या पीढीला माहित नाही, म्हणून संघटनेचा वर्धापनदिन गावागावांत साजरा करून जुना काळ तरुणांसमोर आणण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांना आपल्या मागच्या पीढीचा काळ कळाला तरच या संघर्षाचे महत्व अधोरेखित होईल असे म्हणत समाजातील शेवटच्या माणसाचे दु:ख दूर करुन त्यांच्या जीवनात बदल करण्यासाठी कायम संघर्षाची कास धरा, असे पंडीत म्हणाले.
वर्धापनदिनानिमित्ताने अनेक गावांमध्ये झालेल्या कार्यक्रमात पंडितांसह संघटनेचे पदाधिकारी रामभाऊ वारणा, केशव नानकर, बाळाराम भोईर, विजय जाधव, आराध्या पंडित, सुरेश रेंजड, दत्तू कोळेकर, नलिनी बुजड, अशोक पवार, रामराव लोंढे, अशोक सापटे, लक्ष्मण पडवळे, प्रदीप खैरकर, अनिता धांगडा, जया पारधी, संगीत भोमटे, प्रमोद पवार, राजेश चन्ने, दशरथ भालके, उल्हास भानुशाली, भगवान मधे आदी सहभागी झाले होते.

======================

जुन्या दिवसांची उजळणी
वर्धापनदिनाच्या निमित्ताने श्रमजीवी संघटनेने जिल्ह्यातील प्रत्येक गावसमितीद्वारे गावागावांत आदिवासी समाजाच्या पारंपारिक खाद्यपदार्थ, नाच, गाणी, वयोवृद्ध लोकांकडून जुना काळ आठवून नव्या पीढीसमोर त्या दिवसांची उजळणी केली. तसेच कंदमुळे, वळी, कैला, कांद, आंबील, रानभाज्या आदी खाद्यपदार्थ शिजवून कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे खाल्ले. याद्वारे तरुण पीढीसमोर जुन्या पीढीच्या हाल-अपेष्टांचे चित्र उभे करून आज आदिवासी समाजाची जी प्रगती झाली आहे त्यात संघटनेच्या कामाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

comments

About Rajtantra

Scroll To Top