दिनांक 23 January 2018 वेळ 3:21 AM
Breaking News
You are here: Home » Uncategorized » तलाठ्यांच्या संपाने विद्यार्थ्यांची कोंडी

तलाठ्यांच्या संपाने विद्यार्थ्यांची कोंडी

मयूर भागडे
विक्रमगड, दि. 3 cropped-LOGO-4-Online.jpg: महसूल विभागातील तलाठी कर्मचारी संपावर असल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी लागणार्‍या दाखल्यांवर ते स्वाक्षर्‍या करत नसल्याने विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय.
एका प्रकरणात तलाठ्यांना उत्पन्नाचे दाखले देण्याचा अधिकार आहे का? अशी विचारणा न्यायालयाने केली होती. मात्र त्यासंदर्भात शासनाच्या स्पष्ट सूचना नसल्याने न्यायालयाने संबंधित तलाठ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे राज्यभरातील तलाठी सातबारा उतारे, आठ अ उतारे, फेरफार नक्कल आदी शासनाच्या स्पष्ट सूचना असलेल्या कागदपत्रांवरच स्वाक्षर्‍या करत आहेत. तर उत्पन्नासह अन्य दाखले देण्यासाठी लागणार्‍या जबाब – पंचनाम्यांवर स्वाक्षरी करण्यास नकार दर्शवत याबाबतीत संप पुकारला आहे. मात्र संपाचा सर्वाधिक त्रास हा शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना होत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामासाठी लागणारी कागदपत्रे विहीत मुदतीत महाविद्यालयामध्ये जमा करावी लागतात. तसेच आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना मिळणार्‍या शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याची अंतिम तारीख या महिन्या अखेरपर्यंत आहे. त्यामुळे उत्पन्नाचे व अन्य दाखले मिळणे आवश्यक बनले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. विहीत मुदतीत दाखले न मिळाल्यास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचीत रहावे लागेल, अशी भीती विद्यार्थी व्यक्त करत आहेत. त्यामुळे शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याची मुदत शासनाने वाढवावी, अशी मागणी विद्यार्थीवर्गाकडून होत आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top