दिनांक 18 December 2017 वेळ 3:01 AM
Breaking News
You are here: Home » थोडक्यात महत्वाची बातमी » सामाजिक कार्यकर्ते अनंता वनगा यांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

सामाजिक कार्यकर्ते अनंता वनगा यांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

प्रतिनिधीANANTA VANAGA CONGRESS PRAVESH
पालघर, दि. 1 : जिल्ह्यात कार्यरत असलेल्या आदिवासी मुक्ती मोर्चा या संघटनेचे अध्यक्ष अनंता वनगा यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह माजी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केदार काळे, प्रदेश सरचिटणीस दत्ता नर आदी उपस्थित होते.
येथील जिल्हा काँग्रेस भवनमध्ये गुरुवारी झालेल्या एका कार्यक्रमात वनगांनी प्रवेश घेतला. वनगा हे गेली दहा वर्ष आदिवासी मुक्ती मोर्च्याच्या माध्यमातून आदिवासी समाजात काम करत आहेत. त्यांनी आदिवासी समाजाच्या विविध प्रश्‍नांवर आंदोलने केली आहेत. काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य जनतेच्या हिताचे काम करणारा पक्ष असल्याची आपली भावना आहे. राजकीय पक्षाच्या माध्यमातून आदिवासींच्या प्रश्‍नांना अधिक न्याय देता येईल म्हणून काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे वनगांनी प्रवेशानंतर सांगितले. यावेळी अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष मुस्तफा मेमन, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. विकास पाटील, काँग्रेसचे पालघर तालुकाध्यक्ष सिकंदर शेख, वाडा तालुकाध्यक्ष दिलीप पाटील आदी उपस्थित होते. यावेळी वनगांसह 300 कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.

comments

About Rajtantra

Scroll To Top