दिनांक 23 January 2018 वेळ 3:23 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » कुणबी समाज सेवा संघामार्फत वधू-वर मेळाव्याचे आयोजन

कुणबी समाज सेवा संघामार्फत वधू-वर मेळाव्याचे आयोजन

प्रतिनिधी : cropped-LOGO-4-Online.jpg
कुडूस, दि. 03 : कुणबी समाज सेवा संघ ठाणे या सामाजिक संस्थेच्या वतीने गेली 13 वर्षे समाजातील विवाह इच्छूक वधू-वरांसाठी सुयोग्य जोडीदार एकाच व्यासपीठावर मिळावा, या उदात्त हेतुने वधूवर मेळावा आयोजित केला जातो. ठाणे, पालघर, रायगड व कोकण विभागातील तीन हजार तरूण तरूणींनी आतापर्यंत या मेळाव्याचा लाभ घेतला आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही संस्थेच्या वतीने येत्या रविवारी (दि. 5) 9 वाजता ठाणे पश्चिमेतील वागळे इस्टेट भागातील सेंट लॉरेंस हायस्कूल हॉल येथे वधू-वर मेळावा आयोजित केला आहे. तरी येत्या रविवारी होणार्‍या या मेळाव्यासाठी इच्छूकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मोहन पाटील व वसंत पाटील यांनी केले आहे. इच्छूक तरूण-तरूणींनी नोंदणीसाठी नमुद वेळेत आपला बायोडेटा, जन्म पत्रिका व पोस्टकार्ड साइज फोटो आणावा, असे संस्थेने कळविले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top