दिनांक 23 January 2018 वेळ 3:12 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » विक्रमगड : जादूटोणा प्रकरणातील 3 फरार भोंदूबाबांना 2 वर्षांनंतर अटक

विक्रमगड : जादूटोणा प्रकरणातील 3 फरार भोंदूबाबांना 2 वर्षांनंतर अटक

प्रतिनिधी : VIKRAMGAD JADUTONA
दि. 02 : विक्रमगड तालुक्यातील साखरे येथील जादूटोणा प्रकरणातील 3 फरार भोंदूबाबांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला अखेर यश आले आहे. युवराज भोये, पुंडलिक भोये व श्रीनाथ भोये असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असुन हे तिघेही मागील 2 वर्षांपासुन फरार होते.
अटक आरोपी साखरे गावाच्या शेजारी असलेल्या जंगलात स्मशान भूमित दफन केलेले शवांचे सांगाडे व खोपड्या बाहेर काढून त्याच्यावर अघोरी विद्येचा प्रयोग करुन नागरीकांची फसवणूक करत असे. 5 ऑगस्ट 2015 रोजी याबाबत विक्रमगड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर या तिघांविरोधात भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 297, 286, 489 व महाराष्ट्र नरबळी व जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हे तिघेही फरार झाले होते.
अखेर 2 वर्षांनंतर त्यांना पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक हानमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक ताम्हणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाटील, दिपक राऊत, पोलीस नाईक संदिप सुर्यवंशी, सचिन मर्दे, हवालदार नरेश जनाठे यांच्या पथकाने अटक केली. या तिनही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असुन सहाय्यक पोलिस निरिक्षक माळी याबाबत अधिक तपास करीत आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top