दिनांक 18 December 2017 वेळ 3:02 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » वाडा शहरातील विकासकामांचे भूमिपूजन

वाडा शहरातील विकासकामांचे भूमिपूजन

वाडा दि. 2: शिवसेनेचे पाWADA BHUMIPUJANलघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश गंधे यांच्या विशेष प्रयत्नातून सुमारे 40 लाख रुपये किंमतीच्या मंजूर झालेल्या वाडा शहरातील रस्त्यांचे भूमिपूजन वाडा पंचायत समितीच्या सभापती अश्वीनी शेळके, जिल्हा परिषद सदस्या किर्ती हावरे, पंचायत समिती सदस्य मेघना पाटील, वाडा पोलीस निरिक्षक रवींद्र नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते, यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
गेली अनेक वर्षे वाडा शहरातील अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाल्याने या रस्त्यांवरून चालणेही मुश्किल झाले होते. नागरीकांची ही मुख्य समस्या लक्षात घेवून निलेश गंधे यांनी विशेष प्रयत्न करून वाड्यातील स्टेट बँक ते पंचायत समिती वाडा रस्ता, वाडा मनोर मुख्य हायवे रस्ता ते कादिवली रस्ता, वाडा सिद्धेश्वेर ते गाळे रस्ता, वाडा – देसई मुख्य रस्ता ते यशवंत नगर रस्ता (प्रत्येकी दहा लाख रुपये मंजूर रक्कम) आदी रस्ते मंजूर करवून घेतले होते.
या रस्त्यांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे उप अभियंता धनंजय जाधव, शिवसेना वाडा तालुका प्रमुख प्रकाश पाटील, शहर प्रमुख प्रकाश केणे, उपतालुका प्रमुख तुषार यादव, श्रीकांत आंबवणे, तुषार भानुशाली, निलेश पाटील, उमेश लोखंडे, संजय तरे आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top