दिनांक 18 December 2017 वेळ 3:04 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » टीडीसीसी बँकेच्या नोकर भरतीच्या परीक्षा शुल्कात जीएसटीच्या नावाने लूट

टीडीसीसी बँकेच्या नोकर भरतीच्या परीक्षा शुल्कात जीएसटीच्या नावाने लूट

प्रतिनिधी :
विक्रमगड, दि. 01 : एक देश एक कर अशी भूमिका घेत केंद्र शासनाने व राज्य शासनाने अनेक वस्तुंवर त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तुंवर जीएसटी कर आकारणी सुरू केली आहे. परंतू नोकर भरतीसाठी घेण्यात येणार्‍या परीक्षेच्या शुल्कात पहिल्यांदाच जीएसटी लागू केल्याने या परिक्षेसाठी अर्ज करणार्‍या अनेक बेरोजगार परीक्षार्थींना त्याची झळ सोसावी लागत आहे.
दि. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. cropped-LOGO-4-Online.jpgठाणे (टीडीसीसी) या बँकेच्या नोकरभरतीच्या विविध पदाच्या 205 जागांसाठी जाहिरात विविध वृत्तपत्रांत व जिल्हा बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार विविध पदासाठी पदानुसार शल्क आकारण्यात येत असुन या शुल्कावर पदानुसार 72 ते 118 रुपयांपर्यंत जीएसटीचा अधिभार आकारण्यात आला आहे. यामुळे सरकार स्पर्धा परीक्षांनाही जीएसटी कर लागु करणार का? असा प्रश्‍न उपस्थित झाला असुन तो लागू केल्यास त्याचा फटका स्पर्धा परीक्षा देणार्‍या अनेक गरीब बेरोजगार तरुणांना बसेल, अशी भिती व्यक्त केली जात आहे. स्पर्धा परिक्षांची तयारी करणार्‍या बेरोजगार तरुणांना आधीच नोकरीचा प्रश्‍न सतावत असताना त्यांची अशी जीएसटीच्या नावाने लूट केली जात असल्याने त्यांच्यात नाराजीचे सुर पसरले आहेत.
टीडीसीसी बँकेमध्ये विविध नोकर भरतीच्या 205 जागांसाठी जाहिरात काढण्यात आली आहे. त्यामध्ये ज्युनियर बँकिंग असिस्टंट पदासाठी आकारल्या जाणार्‍या 550 रुपये परीक्षा शल्कात जीएसटी कर लागू केल्याने 100 रुपयांची, सिनियर बँकिंग असिस्टंट पदासाठी आकारल्या जाणार्‍या 550 रुपयांत 108 रुपयांची, शिपाई व पहारेकरी पदासाठी आकारल्या जाणार्‍या 400 रुपयांत 72 रुपयांची, तर अधिकारी पदासाठी आकारल्या जाणार्‍या 650 रुपये शुल्कात 118 रुपयांची वाढ झाली आहे. प्रामुख्याने राज्यात होणार्‍या विविध नोकर भरतीसाठी मागासवर्गीयांसाठी 200 ते 300 व खुल्यावर्गासाठी 300 ते 400 रुपये शल्क आकारले जाते. याबाबत गेल्या वर्षीच शासन निर्णय आला आहे. परंतु टीडीसीसीच्या नोकर भरतीच्या शुल्कात जीएसटी कर आकारल्याने याचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्वाधिक बसणार आहे. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात शुल्क आणि त्यावर आकरण्यात येणार्‍या जीएसटीमुळे अनेक गरीब विद्यार्थ्यांना इच्छा असूनही या नोकरभरतीच्या परिक्षेपासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे या नोकरभरतीसाठी अर्ज भरून आपले नशीब आजमावणार्‍या ग्रामीण भागातील गरीब बेरोजगार सुशिक्षित तरुणांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, पुढील स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांनी याविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली असुन या नोकरभरतीसाठी आकारण्यात येणार्‍या जीएसटी विरोधात मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याची काही विद्यार्थ्यानी तयारी सुरु केली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top