दिनांक 23 January 2018 वेळ 3:21 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » बालहक्क कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करा! राज्य बाल हक्क आयोगाचे सदस्य अ. ना. त्रिपाठींचे आवाहन

बालहक्क कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करा! राज्य बाल हक्क आयोगाचे सदस्य अ. ना. त्रिपाठींचे आवाहन

प्रतिनिधी
पालघर, दि. 1 : बालकांच्याBALHAKKA KAYDA हक्कांचे संरक्षण करणार्‍या कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करून बालकांचे हक्क हिरावले जाणार नाहीत याकरिता संबंधित यंत्रणांनी सजगपणे काम करावे, असे आवाहन राज्य बाल हक्क आयोगाचे सदस्य अ. ना. त्रिपाठी यांनी केले. ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते.
सरकारने बालकांच्या हक्कांचे संरक्षण करणारे विविध कायदे केले आहेत. परंतु त्या कायद्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याने बालकांचे शोषण करणार्‍या असंख्य घटना समाजात घडत असतात. पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. जिल्ह्यात बालकांचे हक्क कोणत्याही प्रकारे डावलले जावू नयेत म्हणून या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी आयोगाचे सदस्य त्रिपाठींनी संबंधित अधिकार्‍यांची मंगळवारी (दि. 1) बैठक घेतली. या बैठकीत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध (पोस्को) कायदा, बाल न्यायालय कायदा (ज्युव्हेनाईल जस्टिस अ‍ॅक्ट), शिक्षण हक्क कायदा, बालकामगार विरोधी कायदा आदी कायद्यांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.
यावेळी बोलताना त्रिपाठी म्हणाले की, पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा असल्याने येथील जनतेत कायद्यांसंबधी माहिती नाही. त्यामुळे यंत्रणा म्हणून आपली जबाबदारी अधिक आहे. समाजात बालहक्क कायद्यांच्या जागृती बरोबरच अंमलबजावणीच्या दृष्टीने अधिक संवेदनशीलपणे काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी बालहक्क कायद्यांबरोबरच कुपोषण, बालमृत्यू, बालविवाह, बालमजूरी बाबतही आढावा घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे, पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे, निवासी जिल्हाधिकारी श्री. जरे यांच्यासह पोलीस विभागाचे अधिकारी, शिक्षणाधिकारी, कामगार अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, बालविकास अधिकारी, ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डाचे अध्यक्ष व सदस्य आदी उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top