दिनांक 23 January 2018 वेळ 3:19 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » वाडा : अज्ञात कारणावरून 72 वर्षीय वृद्धाचा खून

वाडा : अज्ञात कारणावरून 72 वर्षीय वृद्धाचा खून

प्रतिनिधीcropped-LOGO-4-Online.jpg
दि. 01 : काल, मंगळवारी निंबवली येथे एका वृद्धाचा मृतदेह आढळून आला असुन त्याच्या शरीरावर अनेक वार आढळून आल्याने त्याचा अज्ञात कारणांवरुन खून झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वाडा पोलिसांना काल रात्रीच्या सुमारास निंबवली येथे खून झाल्याची खबर मिळाली असता पोलिसांच्या एका पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट दिली. यावेळी तालुक्यातील निंबवली येथे राहणारे मोरेश्वर दामोदर कोळी (वय 72) यांचा मृतदेह त्यांच्या अंगणात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पोलीसांना आढळून आला. त्यांच्या शरीरावर धारदार तीक्ष्ण हत्याराने छातीवर व पोटावर वार केल्याचे दिसून आले. प्रत्यक्षदर्शी कोणीही नसल्याने अज्ञात व्यक्ती विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस मारेकर्‍याच्या तपास करत आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top