दिनांक 18 December 2017 वेळ 3:02 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » वाडेकरांचा श्वास कोंडतोय

वाडेकरांचा श्वास कोंडतोय

वैभव पालवे
वाडा शहर झपाट्याने नागरीकरणाकडे विस्तारत असताना नागरी सुविधा पुरविण्यात ग्रामपंचायत अपयशी ठरली. नागरिकांना स्वच्छतेचा प्रश्‍न अधिक भेडसावतोय. शहराच्या मध्यवर्ती भागात जागोजागी कचरा साचल्याने नागरिकांना नाक मुठीत घेऊन चालावे लागतेय. सत्ताधार्‍यांच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांचा जणू श्वासच कोंडतोय अशी परिस्थिती ओढवली आहे.
शहर वाढू लागल्याने कचरा निर्माण होण्याचं प्रमाण वाढू लागलं. हा संपूर्ण कचरा उचलून शहर स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु यंत्रणा व मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने सकाळी कचरा उचलल्यनंतर पुन्हा काही तासात तसेच कचर्‍याचे ढिग निर्माण होतात. मार्केट परिसरात तर बकाल स्थिती बनली आहे. भाजीपाल्यापासून निर्माण होणारा कचरा कुजल्याने प्रचंड दुर्गंधीचा सामना नागरिकांना करावा लागतो. जैन मंदिराजवळ साठणार्‍या कचर्‍यामुळे तर मोकाट जनावरे कायम या रस्त्यावर ठाण मांडून असतात. जैWADA NAGARPALIKA LEKH 2 Pic1न मंदिर व गणेश मंदिर यासारखी मंदिरं येथे असताना व लागूनच नगरपंचायत (तेव्हाचे ग्रामपंचायत) कार्यालय असताना हा परिसर स्वच्छ ठेवण्यात सत्ताधारी शिवसेना – भाजपला अपयश आलं. रस्त्यावर मोकाट जनावरे कायम तळ ठोकून असल्याने या रस्त्याने चालत जाणे म्हणजे जीवावर बेतणारे आहे. या जनावरांमुळे येथून वाहने चालवणेही दिवसेंदिवस अधिक धोकादायक बनले आहे. मुख्य रस्त्यावर वाचनालयालगत कचरा कायम असतो. येथेही मोकाट जनावरांचा प्रश्‍न गंभीर आहे. तहसीलकडे जाणार्‍या रस्त्यावर साठलेल्या कचर्‍यावर मोकाट जनावरे कायम असल्याने नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. मुख्य बजारपेठेत निर्माण होणारा कचरा साठू नये यासाठी ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे या कचर्‍यावर पोसल्या जाणार्‍या मोकाट जनावरांमुळे अनेकांच्या जीवावर बेतले. गेली दहा वर्ष सत्तेत असलेल्या शिवसेना- भाजपच्या पदाधिकार्‍यांना स्वच्छतेच्या बाबत गांभीर्याने उपाययोजना करण्याची बुद्धी सूचली नाही. शहरातून कचरा उचलायचा आणि गावाच्या वेशीवर टाकायचा या पलीकडे यांची स्वच्छतेची मोहीम गेली नाही.
स्वच्छता अभियानात हातात झाडू घेऊन मिरवणारे सरपंच – उपसरपंच प्रत्यक्ष गावाच्या स्वच्छतेच्या, मल:निस्सारणाच्या बाबतीत व कचरा व्यवस्थापनाबाबत कधी गंभीर राहिले नाहीत. डंपींग ग्राउंडच्या समस्येबाबत काही प्रयत्न झाले नाहीत. शहराच्या प्रवेशद्वारावरच डंपींग निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रचंड दुर्गंधीचा सामना करत लोकांना नाक मुठीत धरूनच येथून जावे लागतेय. तर कचर्‍याला लागलेल्या आगीमुळे प्रचंड धुराचे लोळ निर्माण झाल्याने अपघाताचा धोका संभवतोय. त्यामुळे कचर्‍याची समस्या एवढी गंभीर असताना पदाधिकार्‍यांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने दिवसागणिक ही समस्या वाढू लागली आहे. ज्या कर्मचार्‍यांच्या जीवावर शहराची स्वच्छता अवलंबून आहे, त्या सफाई कर्मचार्‍यांना कोणत्याही सोयीसुविधा हे पदाधिकारी देवू शकले नाहीत. ज्या गटार आणि घाणीत हे कर्मचारी काम करतात त्यांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत असतो. त्यापासून त्यांचे संरक्षण व्हावे म्हणून या सफाई कर्मचार्‍यांना मास्क, हँडग्लोज, बूट यासारख्या सुविधा पुरविणे आवश्यक होते. परंतु या कर्मचार्‍यांना या साध्या सुविधाही हे पदाधिकारी पुरवू शकले नाहीत. ज्या सफाई कर्मचार्‍यांच्या भरवशावर संपूर्ण शहराची स्वच्छता अवलंबून आहे त्यांच्याविषयी एवढी अनास्था सत्ताधारी पदाधिकार्‍यांनी दाखविणे हे शोचनिय आहे.
सफाई कर्मचारी ही देखील माणसं आहेत. त्यांना माणूसपणाचं जीणं जगता यावं ही यंत्रणेची जबाबदारी आहे. याचे या पदाधिकार्‍यांना भानच नव्हते, असे खेदाने म्हणावे लागते. त्यामुळे स्वच्छतेच्या प्रश्‍नाकडे हे पदाधिकारी कधी गंभीरच नसल्याने संपूर्ण शहराला बकाल स्वरूप आले. नागरिक कर भरतात. विशेष म्हणजे स्वच्छता कर म्हणून स्वतंत्रपणे कर भरतात. त्यामुळे शहराच्या स्वच्छतेचा हक्क नागरिकांचा आहे. परंतु सत्ताधार्‍यांना त्याचे सोयर- सुतक नसल्याने कथित स्वच्छता मोहिमेचा पुरता बोजवारा उडाला आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top