दिनांक 18 December 2017 वेळ 2:56 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » मोखाडा : शेकडो घरकुल लाभार्थी अनुदानाच्या प्रतिक्षेत शासकिय तिजोरीत खडखडाट, जनधन खाते ठरले अडसर साहित्य पुरवठादारांचा तगादा, उजळमाथ्याने फिरणे झाले मुश्कील

मोखाडा : शेकडो घरकुल लाभार्थी अनुदानाच्या प्रतिक्षेत शासकिय तिजोरीत खडखडाट, जनधन खाते ठरले अडसर साहित्य पुरवठादारांचा तगादा, उजळमाथ्याने फिरणे झाले मुश्कील

प्रतिनिधी
मोखाडा, दि. 31 : तालुक्यातील 28 ग्रामपंचायतींमधुन विविध योजनांमार्फत शेकडो घरकुलांची कामे सुरू आहेत. परंतू पहिला, दुसरा तसेच अखेरचा टप्पा पुर्ण होऊनही तालुक्यातील शेकडो घरकुल लाभार्थ्यांना नियोजीत अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे आदिवासी घरकुल लाभधारकांची मोठ्या प्रमाणावर कुचंबना झालेली असून बांधकाम साहित्य पुरवठादारांच्या तगाद्यामुळे लाभार्थ्यांना उजळ माथ्याने फिरणेही मुश्कील झाले आहे.
तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना घरकुल लाभार्थी 650, रमाई आवास योजना लाभार्थी 30, शबरी घरकुल आवास योजना लाभार्थी 232, आदिम कातकरी आवास योजना लाभार्थी 28 अशा एकूण 940 लाभार्थ्यांना योजनानिहाय लाभ देण्यात आला आहे. परंतू बहूतांश ठिकाणी MOKHADA GHARKULलाभार्थ्यांना पहिल्या व दुसर्‍या हफ्त्यासाठी दीर्घकाळ प्रतिक्षा करावी लागत आहे. याबाबत चौकशी केली असता प्रत्यक्ष प्रस्तूत शिर्षखाती कमी शिल्लक (लो बॅलेन्स) दिसत असल्याने लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होत नसल्याचे मोखाडा पंचायत समितीच्या लेखा विभागाकडून सांगण्यात आले आहे. यापैकी प्रधानमंत्री आवास योजनेतील 650 लाभार्थ्यांपैकी 173 लाभार्थ्यांच्या अनुदानाच्या रकमेला मंजूरी मिळाली आहे. हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही सुरू असून हफ्त्या दोन हफ्त्यात लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा होतील, असे विस्तार अधिकारी तुषार सुर्यवंशी यांनी सांगीतले.जनधन खात्याची अनुदान लाभात अडचण
मोखाडा तालुक्यात जनधन योजने अंतर्गत बहूतांश लाभार्थ्यांनी बिगर भांडवली खाते खोलले आहे. परंतू आता हेच बिगर भांडवली खाते लाभार्थ्यांना अडचणीचे ठरत आहे. या खात्यांमुळे असंख्य लाभार्थ्यांचे अनुदान जमा होत नसल्याने खात्यात 500 रुपये भरून त्याला बचत खात्यात परावर्तीत करून घेण्याच्या सुचना लाभार्थ्यांना केल्या जात आहेत. त्यातच या खात्यातुन 10 हजार रुपये इतकीच रक्कम उचलण्याची मर्यादा असल्याने जनधन खाते लाभार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरलेली आहेत.बांधकाम साहित्त्य पुरवठादारांचा तगादा
अनेक लाभार्थ्यांचे पहिल्या व दुसर्‍या टप्प्यापर्यंतचे काम झालेले आहे. तर काही ठिकाणी पुर्ण बांधकाम झालेले आहे. लाभार्थ्यांनी हे बांधकाम शासकिय योजनेद्वारे मिळणार्‍या अनूदानाच्या भरवशावर उधार-उसनवारी करुन केले असल्याने बांधकाम साहित्य पुरवठादार पैशांसाठी आता कमालीचा तगादा लावत असल्याने बाजारपेठेतून उजळमाथ्याने फिरणेही मुश्कील झाले असल्याची प्रतिक्रिया माजी सरपंच चंद्रकांत भोई यांनी दिली असून शासनाने तातडीने अनुदान उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top