दिनांक 18 December 2017 वेळ 3:09 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » जव्हारमध्ये रस्त्याचे काम न करता निधी हडपला? सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रताप; ग्रामस्थांनी केली बांधकाम मंत्र्यांकडे तक्रार

जव्हारमध्ये रस्त्याचे काम न करता निधी हडपला? सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रताप; ग्रामस्थांनी केली बांधकाम मंत्र्यांकडे तक्रार

प्रतिनिधी
जव्हार, दि. 31 : तालुक्यातील साकुर ते आखर, केळीचापाडा या गावांना जोडणार्‍या रस्त्याचे डांबरीकरण मजबुतीकरणाचे काम न करताच सार्वजनिक बांधकाम विभागाने बिले अदा केल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे लेखी तक्रार करून संबंधित रस्त्यांच्या कामांची चौकशी करून ठेकेदार व भ्रष्ट अधिकार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
जव्हार तालुक्यातील साकुर तेJAWHAR GHOTALA आखर या गावांना जोडणार्‍या रस्त्यांच्या कामाला 2015-16 या आर्थिक वर्षात आदिवासी विकास विभागाच्या ठक्कर बाप्पा वस्तीसुधार योजने अंतर्गत कामांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये साकुर ते आखर रस्त्यासाठी 12 लाख 49 हजार 924 रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. तर आखर ते केळीचापाडा रस्त्यासाठी 9 लाख 99 हजार 823 रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. या रस्त्यांच्या कामांच्या निविदा काढून कामे मुद्दतीत करण्याचे आदेश बांधकाम विभागाने दिले होते. मात्र बांधकाम विभागाचे अधिकारी, शाखा अभियंता आणि संबंधित ठेकेदार यांनी संगनमताने अद्यापही रस्त्याचे काम केले नाही. तसेच रस्त्यावर खड्डी टाकून ठेवली आहे. मात्र साकुर ते आखर-केळीचापाडा रस्त्याच्या काम केल्याचे दाखवत संबंधित ठेकेदाराला बिलाची रक्कम अदा करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
दरम्यान साकुर ते आकर केळीचापाडा या गावातील आदिवासी विकास विभागाच्या ठक्कर बाप्पा योजनेतील ही कामे न करताच बिले काढल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदारावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केलेल्या तक्रारीत केली आहे.
================

जव्हार तालुक्यातील साकुर ते आखर केळीचापाडा या गावांना जोडणार्‍या रस्त्यावर दोन वर्षापूर्वी खडी टाकली आहे. परंतु रस्ता झाला नाही. तसेच ठेकेदार यांनी रस्त्याचे बिल काढले आहे, असे आम्हाला समजले आहे. रस्त्याच्या कामाची माहिती द्यायला अधिकारी देखील टाळाटाळ करीत आहेत.

सुधाकर वळे, सदस्य, पंचायत समिती, जव्हार

===============
साकुर ते आखर केळीचापाडा या रस्त्याच्या कामांसंदर्भात अधिक माहिती घेतो. हे काम आपल्या कार्यकाळात झालेले नाही. त्यामुळे याबाबतीत लगेच काही सांगता येणार नाही. माहिती घेऊन सांगतो.

– डी. जी. होले, उपअभियंता सां. बा. विभाग, जव्हार

comments

About Rajtantra

Scroll To Top