दिनांक 23 April 2019 वेळ 5:53 AM
Breaking News
You are here: Home » Uncategorized » डहाणू नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात घेऊन स्मृती इराणींचे नाक कापा! -हुसेन दलवाई

डहाणू नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात घेऊन स्मृती इराणींचे नाक कापा! -हुसेन दलवाई

दि. 30 : मुळच्या डहाणूच्या असलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या राहुल गांधींच्या रायबरेली मतदारसंघात फिरतात. म्हणून त्यांच्या डहाणू शहरातील नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात घेऊन त्यांचे नाक कापा! त्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन काँग्रेसचे नेतेHUSSAIN DALVAI खासदार हुसेन दलवाई यांनी डहाणू येथे बोलताना केले. येत्या डिसेंबर मध्ये होणार्‍या डहाणू नगरपालिका निवडणूकीच्या अनुषंगाने आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सभेत ते बोलत होते. टिव्ही सीरियलमध्ये काम करणार्‍या स्मृती इराणी या राजनीतीमध्ये येण्यासाठी सुरुवातीला काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी सोनिया गांधी व अनेक नेत्यांना भेटल्या. मात्र काँग्रेसने प्रवेश नाकारल्यामुळे त्या भाजपमध्ये गेल्याचा आरोपही दलवाई यांनी केला.
डहाणूतील शामराव पाटील काँग्रेस भुवन सभागृहात पार पडलेल्या या सभेत हुसेन दलवाई, माजी खासदार दामू शिंगाडा, विश्वनाथ पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केदार काळे, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत, भगीरथ पोंदा, श्रीमती राजश्री अहिरे, अशोक माळी, बबन चुरी, पांडुरंग बेलकर, मोईज शेख आदी उपस्थित होते. भाजपला हरविण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, कष्टकरी संघटना, श्रमजीवी संघटना या सर्वांना एकत्र करा, असा सल्ला देऊन शहराचा विकास साधण्यासाठी नगरपालिकेवर सत्ता मिळवा असा सल्ला देखील दलवाई यांनी दिला.

दलवाई यांनी स्मृती इराणी यांच्यावर चढवलेल्या हल्ल्यामुळे काँग्रेसने त्यांना या निवडणूकीमध्ये खेचल्याचे मानले जाते. यामुळे आता पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णु सवरा आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार पास्कल धनारे यांच्याबरोबरच स्मृती इराणींची प्रतिष्ठा डावाला लागणार आहे.

अशोक माळी हे काँग्रेस पक्षामध्ये आल्यानंतर पक्षाची वेगाने बांधणी सुरु झाल्याची दिसत असून ते नगराध्यक्षपदाचे दावेदार मानले जातात. तर डहाणू नगरपालिकेतील काँग्रेसचा चेहरा असलेले एकमेव बरखास्त नगरसेवक सईद शेख यांच्या नावाचा देखील आग्रह होत आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top