दिनांक 23 January 2018 वेळ 3:18 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » कुडूस-चिंचघर रस्त्याचे काम रखडले!

कुडूस-चिंचघर रस्त्याचे काम रखडले!

प्रतिनिधी : cropped-LOGO-4-Online.jpg
कुडूस, दि. 30 : कुडूस-चिंचघर या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम मंजूर झाले असून पालकमंत्र्यांचा हस्ते या कामाचे भूमीपूजन होऊन नऊ महिने उलटले आहेत. मात्र खडीच्या चार ढिगांपलीकडे काम पुढे सरकले नसल्याने परिसरातील नागरिकांत तिव्र नाराजी आहे. रस्त्याच्या कामाबाबत ठेकेदाराशी संपर्क केला असता केवळ वायदे व पुढील तारखा कानावर पडत आहेत.
कुडूस-चिंचघर-गौरापूर हा रस्ता शासनदरबारी मंजूर असून याचा पहिला टप्पा कुडूस ते चिंचघर काँक्रिटीकरणाचे काम करावयाचे आहे. सदर कामाचा ठेका वाड्यातील ठेकेदार गणोरे यांनी घेतला आहे. पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते 9 महिन्यांपुर्वी या कामाचे भूमीपूजन झाले. काँक्रिटीकरणाचे काम पावसात झाले असते तर पाण्याचा खर्च वाचला असता व मजबुतीकरण झाले असते. मात्र पाऊस जाऊन आता हिवाळा आला तरीही येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत भोईर, माजी उपसभापती मंगेश पाटील, नंदकुमार पाटील, प्रफुल्ल पाटील यांच्या शेकडो विनंत्यावर ठेकेदाराचे फक्त वायदे व तारखा सुरू आहेत. अलीकडे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी रस्ता पाहणीसाठी येणार होते म्हणून त्यांना रस्त्याचे काम सुरू आहे हे दाखविण्यासाठी रस्त्याच्या कडेला खडीचे चार ढिग टाकले आहेत. ती खडीही अलीकडे रहदारीमुळे रस्त्यावर आल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे. भोईर हे सतत याबाबत अभियंता, ठेकेदार यांना काम कधी सुरू होणार याबाबत विचारणा करतात मात्र अभियंता अथवा ठेकेदार फक्त वायदा देऊन बोळवण करतात. यामुळे सर्व नागरिक व सामाजिक कार्यकर्ते उग्र आंदोलनाच्या तयारीत आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top