दिनांक 18 December 2017 वेळ 3:05 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » साखरशेत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप

साखरशेत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप

प्रतिनिधीcropped-LOGO-4-Online.jpg
जव्हार, दि. 30 : लायन्स क्लब गुलमोहर जुहू आणि स्वराज्य फाऊंडेशन मोखाडा यांच्या संयुक्त विद्यमाने जव्हार तालुक्यातील साखतशेत गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थांना पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले.
साखरशेत गावात जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते नववीपर्यंत शाळा असून या शाळेत 40 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांची आर्थित परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने 40 विद्यार्थ्यांपैकी केवळ 4 विद्यार्थ्यांकडे पाठ्यपुस्तके, वह्या, दप्तर व शैक्षणिक साहित्य आहेत. ही बाब लक्षात घेऊन लायन्स क्लब गुलमोहर जुहू आणि स्वराज्य फाऊंडेशन मोखाडा यांच्या संयुक्त विद्यमाने या विद्यार्थांना शालेयपयोगी सर्व साहित्यांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी संजय खन्ना, कैलास टोपले, रवींद्र गांगोडे, जयु भोरे, भास्कर जोशी, मछिंद्र बदादे, शाळेचे मुख्याध्यपक, शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top