दिनांक 23 January 2018 वेळ 3:28 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » धुंदलवाडी येथे श्रॉफ महाविद्यालयाचे एनएसएस शिबीर संपन्न

धुंदलवाडी येथे श्रॉफ महाविद्यालयाचे एनएसएस शिबीर संपन्न

डहाणू दि. 29 : P. L. SHROFF NSSचिंचणी येथील पी. एल. श्रॉफ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे 7 दिवसीय निवासी शिबिर डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी येथील सोमय्या हॉस्पिटल येथे पार पडले. या शिबिराद्वारे विद्यार्थ्यांना श्रमदानासह ग्रामीण जीवनशैली समजून घेण्यास मदत झाली. 23 ते 29 ऑक्टोबर दरम्यान परिसरातील विविध मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांना लाभ झाला. आज शिबिराच्या शेवटच्या दिवशी समारोप कार्यक्रमात वाड्याचे पोलीस महानिरीक्षक जयप्रकाश घुटे, परुळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत, करंदीकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र घागस, श्रॉफ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रमिला राऊत, कार्यक्रमाधिकारी डॉ. जे. के. पाटील, प्रा. राजेंद्र मोरे आणि प्रा. ज्ञानेश्वर भोसले उपस्थित होते.

या शिबिरात दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांची 1) भारतीय राज्यघटना व माहितीचा अधिकार 2) डिमोनेटायझेशन व त्याचे परिणाम 3) अहिंसात्मक संवाद या विषयावरील व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top