दिनांक 18 December 2017 वेळ 3:00 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » जव्हारच्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले हजारो ग्रामस्थ ग्रामसभा जागरण मेळावा, वयम् चळवळीचा पुढाकार

जव्हारच्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले हजारो ग्रामस्थ ग्रामसभा जागरण मेळावा, वयम् चळवळीचा पुढाकार

मनोज कामडी
जव्हार, दि. 29 : पेसा कायद्यान्वये आदिवासी पाड्यांना पेसा गावांचा दर्जा देण्यात आला असून पाड्यांच्या ग्रामसभेला ताबडतोब मान्यता द्या, ही मागणी घेऊन वयम् चळवळीच्या नेतृत्वाखाली येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामसभा जागरण मेळावाJAWHAR NEWS घेण्यात आला. यावेळी जव्हार-मोखाड्यातील 42 पाड्यांतील सुमारे अडीच हजार ग्रामस्थ अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.
या मेळाव्यात पेसा कायद्याच्या नियमांनुसार पाडोपाड्यांच्या ग्रामसभांना शासनाने तात्काळ मान्यता द्यावी, जल-जंगल-जमीन-रेती-दगड-माती यावरील ग्रामसभेचा अधिकार मान्य करावा, ग्राम पंचायतीकडील निधी व पेसा अबंध निधीवरील ग्रामसभेचा अधिकार मान्य करावा, अशा विविध मागण्या करण्यात आल्या. या ग्रामसभा जागरण मेळाव्यास राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, सहायक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी पवनीत कौर आदी उपस्थित होते.
पेसा कायद्यानुसार गावाने ठराव केल्यापासून साडेचार महिन्यात जिल्हाधिकार्‍यांनी गावाला मान्यता द्यायला हवी. ही मुदत उलटून गेल्यास गाव घोषित केल्याचे मानण्यात येईल, असे नियमांत म्हटले आहे. या गावांनी ठराव दिल्यानंतर हा कालावधी उलटून गेल्याने आमच्या गावांना मान्यता मिळाली आहे, आता आम्ही केलेले ठराव पंचायतीने व शासनाने स्वीकारले पाहिजेत, असे वयम् चळवळीचे अध्यक्ष विनायक थाळकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. त्याचप्रमाणे ग्रामसभांनी रोजगार हमी योजनेच्या कामांचे प्रस्ताव केले आहेत, तेही शासनाने स्वीकारले पाहिजेत. स्थलांतर थांबवायची शासनाची इच्छा असेल तर हे तात्काळ झाले पाहिजे. वनहक्क पट्ट्यांच्या अपीलांची मोजणी पावसामुळे थांबली आहे ती सुरू करावी अशी मागणी वयम्चे कार्यवाह प्रकाश बरफ यांनी यावेळी केली. या मागणीला उपस्थित ग्रामस्थांनी जोरदार समर्थन दिले. यावेळी हजारो आदिवासींनी हजेरी लावून या प्रश्‍नाकडे सरकारचे लक्ष वेधले आहे.

================-

आज या सर्व ग्रामसभा शासनाशी संवाद करण्यास येथे जमल्या आहेत. पेसा कायदा होऊन 20 वर्षे झाली. आता वाट पाहण्याची परिसीमा झाली. शासनाने अधिक अंत न पाहता लोकांना त्यांचे अधिकार द्यावेत, अन्यथा आज आलेल्या भरतीचे उद्या त्सुनामीत रूपांतर होईल.
मिलिंद थत्ते, नेते, वयम् चळवळ
======-=-=–्-=========

पेसा गाव निर्मितीबाबत आपण स्वतः लक्ष घालून लवकरच गावे घोषित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला देऊ. वयम् चळवळीने घेतलेले मुद्दे महत्त्वाचे आहेत, शासन त्याचा गांभीर्याने विचार करेल.
विष्णू सवरा, आदिवासी विकास मंत्री

comments

About Rajtantra

Scroll To Top