दिनांक 23 January 2018 वेळ 3:17 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » विद्यार्थ्यांनी भारतीय राज्यघटनेचा सखोल अभ्यास करावा! -संजीव जोशी

विद्यार्थ्यांनी भारतीय राज्यघटनेचा सखोल अभ्यास करावा! -संजीव जोशी

दि. 29 : विद्यार्थ्यांMANOR NEWSनी भारतीय राज्यघटनेचा सखोल अभ्यास केल्यास त्यांच्यात सामाजिक जबाबदारीची अधिक चांगली जाणीव होईल व समाज घडवण्यासाठी त्याचा उपयोग होईल, असे विचार दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी मनोर येथे बोलताना काढले. ते मुंबईस्थित रिझवी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवासी शिबिरात भारतीय राज्यघटना या विषयावर मार्गदर्शन करीत होते. यावेळी रिझवी महाविद्यालयाच्या प्राध्यापक डॉ. मीनाक्षी सामंत, कार्यक्रम अधिकारी सागर भालेराव, नूतन बाल शिक्षण संघाचे संचालन समिती सदस्य सुधिर कामत, डहाणूतील करंदीकर महाविद्यालयाचे प्राध्यापक पर्सी जामशेतवाला उपस्थित होते. यावेळी कामत यांनी विद्यार्थ्यांना पद्मभूषण ताराबाई मोडक व पद्मश्री अनुताई वाघ यांच्या कार्याचा परिचय करुन दिला तर प्राध्यापक पर्सी यांनी प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत प्रबोधन केले.

comments

About Rajtantra

Scroll To Top