दिनांक 23 January 2018 वेळ 3:27 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » लोकशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सहभाग आवश्यक! -संजीव जोशी

लोकशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सहभाग आवश्यक! -संजीव जोशी

डहाणू : लोकशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकांचा सहभाग वाढला पाहिजे व त्याच्याशिवाय शहराचा विकास साध्य होणार नाही, असे प्रतिपादन दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी डहाणूतील रोटरी सभागृह येथे बोलताना काढले. डिसेंबर 2017 मध्ये डहाणू नगरपालिकेच्या निवडणूका होत असून या निवडणूकीकडे लोकांनी सकारात्मक दृष्टीने पहावे व सक्षम नागरिकांना निवडून देण्याबरोबरच प्रत्येक नागरिकाने नगरपालिका कारभाराकडे लक्ष देऊन शहराचा विकास साधावा असे विचारही जोशी यांनी मांडले.
स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकसहभाग वाढावा यासाठी जोशी यांच्या भारतीय राज्यघटना, नगरपालिका आणि शहराचा विकास या विषयावरील व्याख्यानांचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात येत असून रोटरी सभागृहाव्यतिरिक्त विपूल मेहता यांच्या प्रयत्नातून हरे क्रिष्ण सोसायटी (मसोली-डहाणू) व विपूल गाला यांच्या प्रयत्नांतून निधी रेसिडेन्सी (मल्याण-डहाणू) येथेही अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.DNP NIVDANUK

comments

About Rajtantra

Scroll To Top