दिनांक 18 December 2017 वेळ 3:03 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » विक्रमगड येथील तहसिल कार्यालय १४ वर्षापासून नवीन इमारतीच्या प्रतीक्षेत

विक्रमगड येथील तहसिल कार्यालय १४ वर्षापासून नवीन इमारतीच्या प्रतीक्षेत

प्रतिनिधी

विक्रमगड  दि. 25 : नवनिर्मित पालघर जिल्हातील विक्रमगड येथील तहसिल कार्यालय गेल्या १४ वर्षापासून नवीन इमारतीच्या प्रतीक्षेतअसणाऱ्या तहसिल कार्यालय गेल्या १४ वर्षापासून नवीन इमारतीच्या प्रतीक्षेत आहे. पर्यायी जागेअभावी विक्रमगड येथील तहसिल कचेरीच्या नवीन इमारतीचे बांधकाम रेगाळले आहे. जनतेच्या सोयीच्या दृष्टीने सर्व कार्यालये एकत्र आणण्याच्या योजनेनुसार विक्रमगड तहसिल कार्यालयासाठी नवीन इमारत बांधण्यासाठी जागांची पाहणी_________________________________________________ करण्यात आली  परंतु शासनाच्या नियमाप्रमाणे जागा उपलब्ध होत नसल्याने हा कारभार जुन्याच इमारतीत सुरू आहे. या जीर्ण झालेल्या इमारतीत अपूर्ण जागा व सोयीसुविधाचा अभाव असून याच ठिकाणी भव्य प्रशासकीय इमारत बांधावी जेणेकरून लोकांना सोयीचे जाईल.

जव्हार तालुक्याचे विभाजन होऊन विक्रमगड तालुका निर्मिती होऊन १४ वर्ष  झाली परंतु या तालुक्यातील महत्वाचे असणाऱ्या तहसिल कार्यालयाचा कार्यभार मात्र अजूनही  जुन्याच मंडळ कार्यालयात सुरू आहे. त्यातच निवडणूक, दाखले देणे, संजय गांधी निराधार सारखे विभाग निवास इमारतीत सुरू आहे. अशा अपुर्‍या जागेत किती काळ कामकाज सुरू राहणार आहे? असा प्रश्न जनतेसहित महसूल कर्मचार्यांना पडला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारतीचा आराखडाही तयार केला परंतु जागेअभावी हे काम होत नसल्याचे सांगितले जाते. तरी जनतेच्या सोयीच्या दृष्टीने जागा बघावी व लवकरात लवकर इमारत व्हावी अशी जनतेची मागणी आहे. गेल्या अनेक वर्षापासून विक्रमगड तालुक्यातील शासकीय कार्यालय व्यवस्थेचे नियोजन नसल्याने या समस्येला कर्मचार्‍यांना आणि नागरीकांना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान  तहसिल कार्यालयाच्या कर्मचार्यांना बांधण्यात आलेल्या निवासस्थानाची सुद्धा परिस्थिती मोडकळीस आल्याने हे निवास स्थान गळक्या स्वरूपाचे बनले आहेत.

 

                  

                     

                         जय हिंद  

ओमकार विठ्ठल पोटे (पत्रकार) 

whats up no. ०९२०९२०१२९१

Contact  no. ०९६३७४६६५५७ 

Quick Reply
Send

PrevNext

October 2017

Su Mo Tu We Th Fr Sa
1 2 3 4 5 6 7
8 9 10 11 12 13 14
15 16 17 18 19 20 21
22 23 24 25 26 27 28
29 30 31 1 2 3 4

This folder was last updated 26/10/2017 12:20:26

comments

About Rajtantra

Scroll To Top