दिनांक 23 January 2018 वेळ 3:27 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » डहाणूत 5 लाखाची चोरी करणार्या 4 सर‍ाईत दरोडेखोरांना अटक;

डहाणूत 5 लाखाची चोरी करणार्या 4 सर‍ाईत दरोडेखोरांना अटक;

डहाणूतील  मंडप डेकोरेटर व्यवसायिक प्रविण बारी यांना मोटरसायक थांबवुन बोलण्यात गुंतवून पर्समधील 5 लाख लंपास करुन पसार झालेल्या 4 सराईत चोरांना अटक करण्यात डहाणू पोलीस‍‍ांन‍ा यश आले आहे. सनाभाई वाघेला, अरविंद वाघेला, विजय माळी , जयेशभाई वाघेला अशी आरोपींची नावे असून चारही आरोपींना गुजRajtantra_EPAPER_261017_1_111044रात राज्यातील भरुच व वडोदरा जिल्ह्यातून पोलिसांनी ताब्यात घेत त्यांनी चोरलेला मुद्देमाल रोख रक्कम 5 लाख पाच हजार रुपये पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपींना डहाणू न्यायालयात हजर केले असता 14 दिवसाची रिमांड देण्यात आली आहे.5 महिन्यांपुर्वी सदर घटना घडली होती.याबाबत डहाणू पोलिस ठाण्यात कलम 379/34 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला होता.पोलीसांनी शिताफ़ीने सापळा रचुन या सराईत चोरांन अटक केली.
प्रवीण बारी आणि त्यांचे पत्नी  मोटारसायकल ने डहाणू पूर्व मधील कैनाड नाका फुगा फेक्टरी जवळील सार्वजनिक रस्त्याने जात असताना रस्त्यातच थांबवुन बोलण्यात गुंतवून मोटारसायकल वर लेदर पर्स मध्ये ठेवलेली रोख रक्कम 5 लाख पाच हजार  रुपयांची पर्स चोरट्यानी लांबवली होती.  पोलीस अधीक्षक मंजुनाथ शिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपवीभागीय पोलिस अधिकारी  व डहाणू पोलीस निरीक्षक सुदाम  शिंदे यांनी आरोपीच्या मोबाईल कॉल रेकॉर्ड, आणि अन्य माहिती सायबर सेल व स्थानिक गुन्हे शाखे कडून मिळवून तपास सुरू केला होता,पोलिसांनी केलेल्या तपासात  5 लाखाची चोरी करणाऱ्या 4 सराईत चोरट्यांचा गुजरात राज्यातून  मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळाले.

comments

About Rajtantra

Scroll To Top