दिनांक 23 January 2018 वेळ 3:09 AM
Breaking News
You are here: Home » महा माहिती » डोल्हारा ग्रामस्थांच्या रास्ता रोकोला यश

डोल्हारा ग्रामस्थांच्या रास्ता रोकोला यश

001

मोखाडा तालूक्यातील मौजे डोल्हारा येथील साठवण तलावाचे प्रलंबीत काम तातडीने सुरू करावे ही मागणी घेवून डोल्हारा ग्रामस्थांनी मोखाडा चौफूलीवर सकाळपासून रास्ता रोको केला होता.या रास्ता रोको ला अपेक्षीत यश मिळाले असून दि.२२ मार्च पूर्वी रखडलेल्या कामाला सुरूवात केली जाईल असे ठोस आश्वासन ठेकेदार चंपानेरकर & कंपणी व उपअभियंता एन्.एस्.मोहीते यांनी दिल्यानंतर आंदोलकांनी रास्ता रोको मागे घेतला आहे.
सन २०१२ मध्ये पार्वतीबाई जाधव यांच्या मृत्यू नंतर पाझर तलावाच्या कामाला सुरूवात करण्यांत आली होती.त्याचे पुढे साठवण तलावात रूपांतर झाल्याने त्यात लक्षणीय खंड पडला होता.दरम्यानच्या अवधित डोल्हारा वासीयांनी हा जिव्हाळ्याचा प्रश्न घेवून अनेकवार रास्ता रोको , उपोषण आदि मार्गांचा अवलंब करून प्रशासनाला धारेवर धरले होते.या प्रश्नी तब्बल ६ वेळा तारांकीत प्रश्न होवून देखील वाळूत डोके खुपसून बसलेले ढिम्म प्रशासन जागे होत नसल्याने ग्रामस्थांना पुन्हा रास्ता रोको करावा लागला आहे. लघू पाटबंधारे विभागासह मेरी सारख्या इतर संलग्न विभागांकडूनही त्याबाबत कमालीची चालढकल होत असल्याने डोल्हारा वासीयांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागण्यास विलंब होत आहे.
तथापी आज रोजी च्या रास्ता रोकोने जिल्हा प्रशासनही हादरले असून साठवण तलावाच्या कामाला दि.२२ मार्च रोजी ख-या अर्थाने सुरूवात होईल असे चिन्ह दिसत आहे.

comments

About rajtantra

Scroll To Top