डहाणू : भाजपा निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन भरत राजपूत व समर्थकांची अनुपस्थिती

0
136
राजतंत्र मिडीया
डहाणू दि. ८: राष्ट्रIMG-20171007-WA0009वादी कॉंग्रेसमधून अलीकडेच भाजपामध्ये दाखल झालेले रविंद्र फाटक यांच्या पुढाकाराने सुरु करण्यात आलेल्या डहाणू नगरपालिका निवडणूकीसाठीच्या भाजपाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विष्णू सवरा यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी खासदार चिंतामण वणगा, जिल्हाध्यक्ष तथा आमदार पास्कल धनारे, प्रदेश कार्यकारीणी सदस्य बापजी काटोळे, यांच्यासह पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे, डहाणू तालुका पंचायत समितीचे सभापती राम ठाकरे उपस्थित होते. आगामी डहाणू नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन म्हणजे प्रचाराचा नारळ फोडल्याचे मानले जात आहे.
     कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी सदानंद करंदीकर, डॉ. अमित नहार, भाविक सोरठी, माजी नगरसेवक प्रकाश माच्छी, नगरसेविका भारती ठाकूर, सौ. गौरी वागळे, अल्पसंख्याक आघाडीचे मिराज खान, रोहिंग्टन झाईवाला, डहाणू तालुका पंचायत समितीचे माजी उप सभापती लतेश राऊत, विश्राम पटेल, युवा मोर्चाचे आदित्य अगरवाल यांसह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
      कार्यक्रमाला भरत राजपूत आणि समर्थक अनुपस्थित:
कार्यक्रमाला नगराध्यक्षपदाचे दावेदार असलेले भाजपचे स्थानिक नेते भरत राजपूत यांच्यासह शहर अध्यक्ष भरत शहा व राजपूत समर्थक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली. यामुळे भाजपमधील गृह कलह पुन्हा एकदा समोर आला आहे.
     मिहीर शहा देखील अनुपस्थित:
राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून रविंद्र फाटक यांच्यासोबत भाजपमध्ये दाखल झालेले माजी नगराध्यक्ष मिहीर शहा हे देखील या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याने रविंद्र फाटक आणि मिहीर शहा यांच्यात देखील नगराध्यक्ष पदासाठी स्पर्धा असल्याचे संकेत मिळत आहेत.
Print Friendly, PDF & Email

comments