दिनांक 23 January 2018 वेळ 3:25 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » संस्थेच्या ठोस आश्वासनानंतर शिक्षिकेचे उपोषण मागे

संस्थेच्या ठोस आश्वासनानंतर शिक्षिकेचे उपोषण मागे

प्रतिनिधी
वाडा, दि. २६ : येथील शिक्षक संचालित शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदीर या माध्यमिक शाळेत गेली चार वर्ष विनावेतन सेवा करणाऱ्या नूतन बोरसे या शिक्षिकेला संस्थाचालकांनी तडकाफडकी कामावरून काढल्याने याविरोधात ह्या शिक्षिका २ ऑक्टोबर पासून शाळेसमोर आमरण उपोषणाला बसल्या होत्या. अखेर उपोषणाच्या चौथ्या दिवशी संस्थेने त्यांना पुन्हा पूर्वीच्याच पदावर नियमित केल्याचे लेखी पत्र दिल्या नंतर शिक्षिका बोरसे यांनी उपोषIMG-20171005-WA0024ण मागे घेतले आहे.
     उपोषणाला बसल्यापासून गेले चार दिवस संस्थेचे पदाधिकारी उपोषणकर्त्या बोरसे यांच्याशी चर्चा करून योग्य तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करीत होते. आज अखेर वाडा पोलिस निरीक्षक रविंद्र नाईक, सामाजीक कार्यकर्ते व बहुजन विकास आघाडीचे तालुका अध्यक्ष अनंता भोईर, अनंत सुर्वे, किरण थोरात, शेकापचे सचिन मुकणे  यांनी संस्थेचे सरचिटणीस भ. भा. जानेफळकर, ना. के. फडके, महेश वाळुंजकर, सुरेंद्र खांडेकर व सुभाष बनकर यांच्याशी चर्चा के
ली. यानंतर संस्थेने सकारात्मक प्रतिसाद देत शिक्षिका बोरसे यांना कामावरून कमी करण्याचा दिलेला आदेश  मागे घेत पुन्हा त्याच पदावर विनाशर्त नियमित करण्याचे लेखी पत्र देण्याचे मान्य केले. त्यानंतर या शिक्षिकेने आपले उपोषण मागे घेतले.
      यावेळी  तहसीलदार दिनेश कुऱ्हाडे यांच्या उपस्थितीत संस्थेने मागण्या मान्य केलेले पत्र उपोषणकर्त्या शिक्षिका बोरसे यांना देण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार विठ्ठल गोसावी, अतिरिक्त गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते, गटशिक्षणाधिकारी कृष्णा जाधव यांच्यासह संस्थेचे पदाधिकारीही पदाधिकारी उपस्थित होते

comments

About Rajtantra

Scroll To Top