दिनांक 18 December 2017 वेळ 3:03 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » पळसुंडा आणि सुर्यमाळ आश्रमशाळांची कामे कुर्मगतीने

पळसुंडा आणि सुर्यमाळ आश्रमशाळांची कामे कुर्मगतीने

मोखाडा तालुक्यात मौजे पळसुंडा आणि सुर्यमाळ येथे नविन आश्रमशाळा ईमारतींची कामे सुरू आहेत.मागील ४ वर्षांपासून ईमारतींची कामे सुरू असून प्रस्तूत कामांची विहीत मुदतही संपून गेली आहे.तरी देखील ईमारती अर्धवट अवस्थेतच आहेत.त्यामूळे विद्यार्थ्यांना आजही दाटीवाटीने शिक्षन घ्यावे लागत आहे.IMG-20171004-WA0123
मोखाडा तालुक्यातील जुन्या आश्रमशाळा ईमारतींची अवस्था अत्यंत बिकट आहे.शेकडो विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी शिक्षण आणि त्याच ठिकाणी निवासाची सोय असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जिवनमानावर एकप्रकारची मरगळ आलेली आहे.त्यामूळे आदिवासी विकास विभागाने कोट्यावधी रूपये खर्चून अद्ययावत ईमारती उभ्या करण्यासाठी ठेके दिलेले आहेत.परंतू अधिकारी आणि ठेकेदारांच्या
उदासीनतेमूळे तब्बल वर्षाने मुदतबाह्य होवूनही पळसुंडा येथील ईमारतीच्या दारे , खिडक्या , फरस्या तर सुर्यमाळ येथील ईमारतीचे शेकडा ५०%काम अपूर्ण आहे.प्रस्तूतची कामे ही मुदतीत पुर्ण झाली असती तर अंदाजपत्रकीय रकमेत पुर्ण झाली असती मात्र सदरच्या कामांमध्ये लक्षणिय चालढकल झाल्याने आदिवासी विकास विभागाच्या पर्यायाने शासनाच्या तिजोरीवर आणखी कैक कोटींचा भार पडणार आहे.
आदिवासी विकास विभागाने आत्ता स्वतंत्रपणे बांधकाम विभागाची निर्मीती केली आहे.तथापी जुनी आणि अर्धवट स्थितीतील बांधकामे आत्ता आदिवासी विभागाचे बांधकाम खाते पुर्ण करणार की सार्वजनिक बांधकाम खाते पुर्ण करणार याबाबतचे धोरण निश्चित नसल्याने रखडलेल्या बांधकामांबाबत आणि निधीच्या उपलब्धीबाबत सांशक वातावरण असून नविन ईमारतींच्या प्रतिक्षेत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना आणखी २/३ वर्षे तरी वाट पहात रहावे लागणार आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top