दिनांक 23 January 2018 वेळ 3:23 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचा मोर्चा

विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचा मोर्चा

वाडा/प्रतिनिधी
  महाराष्ट्र राज्य अंगIMG-20171004-WA0005णवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी   बुधवारी वाड्यातील खंडेश्वरीनाका येथून तहसीलदार कार्यालया पर्यंत मोर्चाचे आयोजन केले होते.यावेळी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
   अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान 10 हजार मानधन देणे, लाभार्थ्यांच्या आहार रकमेत तिपटीने वाढ करणे, टीएचआर बंद करून लाभार्थ्यांना पर्यायी आहार देणे, जून ते ऑगस्ट महिन्यांचे मानधन देणे, अमृत आहार योजनेत कर्मचाऱ्यांचे खर्च झालेले पैसे देणे अश्याया विविध मागण्यांसाठी बुधवारी खंडेश्वरीनाका ते तहसीलदार कार्यालय असा मोर्चा काढून आपल्या मागण्यांसाठी ठिय्या केला. यावेळी वाडा तहसीलदारांना भेटून आपल्या समस्या शासन दरबारी पोहोचवण्यात आल्या , यावेळी तहसीलदारांनी सकारात्मकता दाखविल्याने व काही आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.
   या आंदोलनात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी यांच्यामार्फत शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते.तर या आंदोलनास शिवसेना वाडा तालुकाच्या वतीने पाठिंबा दर्शविण्यात आला. मागण्यांन बाबतचे निवेदन तअहसीलदार यांना सादर करत असताना वाडा तालुका प्रमुख प्रकाश पाटील व महिला आघाडीच्या ज्योती ठाकरे उपस्थित होत्या.

comments

About Rajtantra

Scroll To Top