दिनांक 18 December 2017 वेळ 3:02 AM
Breaking News
You are here: Home » संग्राह्य बातम्या » वाडा : खंडेश्वरीनाका येथे 2 लाखांचा गुटखा जप्त

वाडा : खंडेश्वरीनाका येथे 2 लाखांचा गुटखा जप्त

प्रतिनिधी
वाडा, दि. 17 : राज्यात गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी असताना शेजारील राज्यातून राजरोसपणे गुटखा आणून विकला जात आहे. 27 ऑगस्ट रोजी तालुक्यात नाकाबंदी दरम्यान दीड लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला होता. मात्र या घटनेला महिनाही उलटला नसताना रविवारी सकाळच्या सुमारास खंडेश्वरीनाका येथे पोGUTKHAलीसांनी सुमारे 2 लाखांचा गुटखा जप्त केला असुन 4 जणांना ताब्यात घेतले आहे.
पोलीस निरीक्षक रविंद्र नाईक यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उप निरीक्षक एच. बी. धनगर यांनी पोलीस नाईक मोहन शेळके, पोलीस शिपाई नागेश निल व गजानन जाधव यांच्यासह सकाळी सहा वाजता खंडेश्वरी नाका येथे सापळा रचून मनोरहून वाड्याच्या दिशेने येत असलेल्या एम.एच.04/डी.एन.5745 या क्रमांकाच्या इनोव्हा गाडीला अडवून चौकशी केली असता गाडीत मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला. बाजारभावानुसार या मालाची किंमत दोन लाख रुपयांच्या वर असल्याचे समजले तर गुजरात येथील खरेदीची किंमत एक लाख पाच हजार रुपये असल्याचे ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी एकाने सांगितले. हा गुटखा उल्हासनगर येथे विक्रीसाठी नेला जात होता. दरम्यान, पोलीसांनी माल व गुन्ह्यासाठी वापरलेली इनोव्हा कार जप्त केली असून वाहन चालकासह इतर तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top