दिनांक 23 January 2018 वेळ 3:22 AM
Breaking News
You are here: Home » पाठपुरावा » केएसएल कंपनी भरतीत भूमीपूत्रांना डावलले स्थानिकांच्या हक्कासाठी मनसे सरसावली

केएसएल कंपनी भरतीत भूमीपूत्रांना डावलले स्थानिकांच्या हक्कासाठी मनसे सरसावली

प्रतिनिधी
वाडा, दि. 17 : स्थानिकांना नोकरीत 80 टक्के प्राधान्य देण्याचे शासनाचे धोरण असतानाही मुसारणे गाव हद्दीतील केएसएल या धागा बनवणार्‍या कंपनीने शासनाच्या पत्रकाKSL BHIMIPUTRAला केराची टोपली दाखवत परप्रांतीय कामगारांची भरती केली असल्याचा आरोप मनसेने एका निवेदनाद्वारे केला आहे.
या कंपनीत कापसापासून धागा बनवण्याचे काम केले जाते. गेल्या कित्येक वर्षापासून कंपनीतील एकाही कामगाराला नोकरीत कायम केले नसून किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतनही दिले जात नसल्याचेही या निवेदनात म्हटले आहे. कामगारांना केवळ राबवून घेणार्‍या व स्थानिकांना रोजगाराची संधी न देणार्‍या या कंपनीची चौकशी करून कंपनीला कामगार व कंपनी कायद्याप्रमाणे काम करण्यास भाग पाडावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष साळवी यांनी सहाय्यक कामगार आयुक्त भोसले यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top