दिनांक 23 January 2018 वेळ 3:26 AM
Breaking News
You are here: Home » संग्राह्य बातम्या » माकुणसार येथे जिल्हास्तरीय मिनी मॅरेथॉन संपन्न

माकुणसार येथे जिल्हास्तरीय मिनी मॅरेथॉन संपन्न

दि. 17 : पालघर जिल्हा ऍथलेटीक्स असोसिएशनशी संलग्न असलेल्या माकुणसार स्पोर्टस् फॉऊंडेशनतर्फे आयोजित मिनी मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गत वर्षीप्रमाणे यावर्षी देखील जिल्ह्यातील धावपटूंनी मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभाग नोंदवला. स्पर्धेमध्ये विक्रमगड, जव्हार या ग्रामीण भागातील खेळाडूंनी विशेष दबदबा निर्माण केMAKUNSAR MARETHONला.
ग्रामीण भागात मॅरेथॉन धावपटू घडवणे हे उद्दिष्ट ठेवून, तसेच हरित पर्यावरण संरक्षण आणि झाडे लावा! झाडे जगवा! हा संदेश देण्यासाठी या दौडीचे आयोजन करण्यात आले होते. मॅरेथॉन स्पर्धा एकंदरीत चार गटात विभागली होती. आबालवृद्धांनी देखील मोठ्या उत्साहाने मॅरेथॉन दौडमध्ये सहभाग घेतला. माकुणसारचे सरपंच जयंत पाटील, वसई विकास बँकेचे संचालक भुषण सावे, पालघर जिल्हा व्हॉलीबॉल संघटक सचिव कमळाकर पाटील, नाबार्डचे जनरल मॅनेजर विलास सावे आणि पंचायत समिती सदस्य सुभाष म्हात्रे यांच्या हस्ते मॅरेथॉनचे उद्घाटन आणि फ्लॅग ऑफ झाले. यावेळी पालघरमधील युवा क्रिकेटर भारतीय संघातील सिद्धार्थ आक्रे, व्हॉलीबॉल राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू साहिल ठाकूर आणि कबड्डीपटू रक्षित पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
मॅरेथॉनच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख मान्यवरांमध्ये बांधकाम व आरोग्य सभापती दामोदर पाटील, महाराष्ट्र स्पोर्टस् ऍकॅडमीचे अध्यक्ष संजय पाटील, उद्योजक लक्ष्मण कोलते, उद्योजक मिलिंद म्हात्रे, पोलीस अधिकारी सिद्धवा जायभाये, वन परिक्षेत्र अधिकारी रुचिता संखे, अमोल मोहिते, प्रविण भोईर आदी उपस्थित होते.
मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लक्ष्मीकांत पाटील, माकुणसार स्पोर्टस् फॉऊंडेशनचे अध्यक्ष मनिष ठाकूर, उपाध्यक्ष मनिष किणी, चिटणीस रुपेश पाटील, खजिनदार योगेश म्हात्रे, सर्व कार्यकारी सदस्य आणि गावातील स्वयंसेवकांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची धुरा नितिन राऊत, प्रतिक मोरे आणि भावेश म्हात्रे यांनी सांभाळली.

विजेते स्पर्धक
11 कि.मी गट – पुरुष
प्रथम – ज्ञानेश्वर मोरघा, विक्रमगड
द्वितीय- युवराज थेतले, जव्हार
तृतीय- नरेंद्र उगले, सायवन

11 कि.मी – महिला
प्रथम- जयश्री बुजाडे, सायवन
द्वितीय- दिक्षा उगले, सायवन
तृतीय- कविता भोईर, खांड

5 कि.मी – पुरुष गट
प्रथम- विशाल पाटील, नावझे
द्वितीय- दिपेश चौई, मथाणे
तृतीय- रोहन माकी, कपासे

5 कि.मी – महिला गट
प्रथम – जानवी हेमाडे
द्वितीय- साक्षी पाटील, माकुणसार
तृतीय- सृष्टी पाघरे

3 कि.मी- पुरुष गट
प्रथम – विराज म्हात्रे
द्वितीय- राहुल मोहिते
तृतीय- अमित बुजड

3 कि.मी – महिला गट
प्रथम- सायली कुडू
द्वितीय- जुईका पाटील
तृतीय- विपुला काटेला

ज्येष्ठ नागरिक पुरुष गट
प्रथम- अनंत म्हात्रे
द्वितीय- मोहन जाधव
तृतीय- वसंत पाटील

ज्येष्ठ नागरिक महिला गट
प्रथम- सुशिला तळकर
द्वितीय- हर्षला कुडू
तृतीय- आशा राऊत

comments

About Rajtantra

Scroll To Top