दिनांक 23 January 2018 वेळ 3:19 AM
Breaking News
You are here: Home » महान्यूज़ » पालघर जिल्ह्यातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय सुरु

पालघर जिल्ह्यातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय सुरु

राजतंVAIDKIY MAHAVIDYALAY1त्र मिडीया नेटवर्क
दि. 17 : पालVAIDKIY MAHAVIDYALAYघर जिल्ह्यात पहिले वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचा बहुमान वेदान्ता इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्सला मिळाला आहे. एका शानदार कार्यक्रमाद्वारे महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या वर्गातील मुलांना स्थानिक खासदार चिंतामण वणगा यांच्या हस्ते लॅपटॉप व पुस्तकांचे वाटप करुन वर्ग सुरु करण्यात आले. यावेळी स्थानिक आमदार पास्कल धनारे, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश कासार, डॉ. मानसिंग पवार, पद्मश्री डॉ. एस. एस. वैश्य आदि मान्यवर उपस्थित होते.
56 एकर क्षेत्रावर उभारलेल्या या वैद्यकीय महाविद्यालयात 300 कॉटची क्षमता असलेले रुग्णालय देखील असून यामधून केवळ 5 रुपये नाममात्र नोंदणी शुल्क घेऊन रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. सुसज्ज रक्तपेढी, रुग्णवाहिका सेवा, वैद्यकीय प्रयोगशाळा, रेडीऑलॉजीची सुविधा, तज्ञ डॉक्टर अशा सुविधांमुळे परिसरातील आदिवासी बांधवांना याचा लाभ होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना खासदार वनगा यांनी आपण डॉक्टर होऊ इच्छित होतो, परंतु ते शक्य झाले नाही आणि मी वकील झालो. या परिसरात डॉक्टरांची खूप कमतरता असून येथून शिकणार्‍या विद्यार्थ्यांनी ग्रामीण व आदिवासी परिसरात आरोग्यसेवा देण्याचा अवश्य प्रयत्न करा, असे आवाहन केले.

comments

About Rajtantra

Scroll To Top