दिनांक 23 January 2018 वेळ 3:25 AM
Breaking News
You are here: Home » थोडक्यात महत्वाची बातमी » स्वच्छता हीच सेवा अभियानाचा केळवे येथून शुभारंभ

स्वच्छता हीच सेवा अभियानाचा केळवे येथून शुभारंभ

पालघर, दि. 17 : जिल्हाभरात स्वच्छतेबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी पालघर जिल्हा परिषदेतर्फे 16 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर दरम्यान स्वच्छता हिच सेवा अभियान राबविले जाणार आहे. या अभियानाचा काल, शनिवारी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे यांच्या हस्ते केळवे येथुन शुभारंभ करण्यात आला. स्वच्छ आणि निरोगी जिल्हा निर्माण करून जिल्ह्याची प्रगतीच्या दिशेने सुरु असलेली वाटचाल गतिमान करण्यासाठी सर्व जनतेने या अभियानात सहभाग घ्यावा, असे आवाहन खरपड यांनी याप्रसंगी केले.
यावेळी पालघर जिSWATCHTA HICH SENA ABHIYANल्हा परिषदेचे सभापती सुरेश तरे, योगेश पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, पालघर पंचायत समितीच्या सभापती मनीषा पिंपळे, मेघन पाटील, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी जेजुरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चव्हाण, श्री. देवऋषी, शिक्षण अधिकारी श्रीम. भागवत, श्री कंकाळ, केळवे ग्रामपंचायतीच्या सरपंच भावना किणी यांसह पंचायत समिती सभापती व सदस्य उपस्थित होते. पालघर जिल्ह्यात सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संघटना आणि जनतेने केलेल्या सहकार्यामुळे लवकरच पालघर जिल्हा हगणदारीमुक्त घोषित होणार असुन हे मिशन शेवटच्या टप्प्यात असल्याने सर्वांनी जोमाने कार्य करावे, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचार्‍यांना दिल्या.
या अभियानांतर्गत पूर्ण जिल्हाभरात स्वच्छतेबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन या पंधरवड्यात करण्यात येणार आहे. यात परिसर स्वच्छता, गावात स्वच्छता सभा घेणे, पथनाट्य, स्वच्छता रॅली, स्वच्छ भारतसाठी मी काय करू शकतो/शकते या विषयावार निबंध स्पर्धा, स्वच्छता दिंडी आदी उपक्रमांचा समावेश आहे. तसेच गाव पातळीवर श्रमदानातून सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी स्वच्छता विषयक कार्य करणार आहेत, अशी माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. खिलारे यांनी आपल्या प्रस्तावनेतून उपस्थितांना दिली व 2 ऑक्टोबर रोजी पालघर जिल्हा हागणदारीमुक्त घोषित करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यास सर्वांचे सहकार्य मिळावे, अशी विनंती केली.
स्वच्छतेचे महत्व लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व स्वच्छ पालघर, सुंदर पालघरचा नारा प्रत्यक्षात खरा करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन या मोहिमेत सहभाग घ्यावा, यासाठी स्वच्छतेची शपथ या प्रसंगी घेण्यात आली.

comments

About Rajtantra

Scroll To Top