दिनांक 18 December 2017 वेळ 3:03 AM
Breaking News
You are here: Home » नागरिक पत्रकार » गुंतवणूकदारांची 81 लाखांची फसवणूक शुभम करोतीच्या 3 जणांविरुद्ध गुन्हा

गुंतवणूकदारांची 81 लाखांची फसवणूक शुभम करोतीच्या 3 जणांविरुद्ध गुन्हा

बोईसर, दि. 12 : आरडी व फिक्स डिपॉझिटच्या स्वरुपात लोकांकडून लाखो रुपयांची गुंतवणूक करुन घेऊन ठेवीची मुदत संपूनही रक्कम परत न करता पसार झालेल्या शुभम करोती फूड्सLOGO 4 Online प्रा. ली. नामक कंपनीच्या 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमित सक्सेना (रा. पुणे), सुधीर पवार (रा. पुणे) व श्रीपती यादव (रा. तलासरी) अशी तिघांची नावे असुन त्यांच्यावर 100 गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता कदम या महिलेने याबाबत बोईसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असुन सुमित सक्सेना, सुधीर पवार व श्रीपती यादव या तिघांनी बोईसरमल यशवंत सृष्टी येथे शुभम करोती फूड्स प्रा. ली. नावाची कंपनी उघडून कदम यांच्यासह अन्य काही लोकांना कंपनीचे साखळी पद्धतीने सदस्य बनवले होते. सन 2013 ते 2016 या कालावधीत या सदस्यांमार्फत 100 लोकांकडून 200 ते 5 हजार रुपयांपर्यंतची रक्कम आरडी व फिक्स डिपाझिटच्या नावाखाली गुंतवून घेण्यात आली होती. मात्र यातील काही गुंतवणुकदारांच्या ठेवीची मुदत संपल्याने त्यांनी आपल्या खात्यातील जमा रक्कम काढण्यासाठी शुभम करोतीच्या कार्यालयाला भेट दिली असता सुमित, सुधीर व श्रीपती हे तिघेही कंपनी बंद करुन फरार झाल्याचे पुढे आले आहे. या तिघांवर फिर्यादी कदम यांच्यासह 100 लोकांची 81 लाखांनी फसवणूक केल्याचा आरोप असुन त्यांच्याविरोधात बोईसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांचा शोध सुरु असुन पोलीस उप निरिक्षक एच. बी. धनगर अधिक तपास करीत आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top