दिनांक 23 January 2018 वेळ 3:25 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानदारांना ई-पॉस यंत्राचे वाटप

जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानदारांना ई-पॉस यंत्राचे वाटप

पालघर, दि. 15 : अE POSE YANTRAन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने सार्वजनिक वितरण प्रणालीच्या संगणकीकरण प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना ई-पॉस यंत्राच्या माध्यमातुन रास्तभाव धान्य दुकानामार्फत अन्नधान्याचे वितरण करण्याचे निश्चित केले आहे. या प्रकल्पांतर्गत पालघर जिल्ह्यातील वसई, वाडा व पालघर या तीन तालुक्यांकरीता 560 ई-पॉस यंत्रे नुकतीच प्राप्त झाली. सदर यंत्राचे तीनही तालुक्यातील रास्तभाव धान्य दुकानदारांना पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात वाटप करण्यात आले. तसेच जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांचे मार्गदर्शनाखाली ओसिस कंपनीमार्फत रास्तभाव धान्य दुकानदारांना प्रशिक्षण व प्रात्याक्षिक दाखविण्यात आले. उर्वरीत पाच तालुक्यांकरीता देखील लवकरच हे यंत्र प्राप्त होणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी यावेळी सांगितले. ई-पॉस यंत्राव्दारे धान्य वितरणात पारदर्शकता येणार असून काळाबाजार व गैरव्यवहारास निश्चितच आळा बसणार आहे. प्रत्येक लाभार्थ्यास कधी व किती धान्याचे वितरण झाले, याची माहिती ग्रामस्तर ते मंत्रालय स्तरावर सर्वांना ऑनलाईन घेता येणार आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top