दिनांक 23 January 2018 वेळ 3:22 AM
Breaking News
You are here: Home » महान्यूज़ » खोडाळा मंडळ कृषी कार्यालय मोजतेय शेवटची घटका

खोडाळा मंडळ कृषी कार्यालय मोजतेय शेवटची घटका

प्रतिनिधी :
दि. 14 : मोखाडा तालूक्यातील अतिशय महत्वाचे आणि शेतकर्‍यांचा मोठ्या प्रमाणावर राबता असलेले खोडाळा मंडळ कृषी अधिकारी कार्यालय मोडकळीस आलेले आहे. येथील कर्मचार्‍यांना जीव मुठीत घेवून कार्यालयीन कामकाज करावे लागत आहे. प्रस्तूत कार्यालयाची इमारत कधीही जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर असल्याने परिसरातील रKHODALA KRUSHI KARYALAYहिवाशांच्या जीवीतालाही धोका निर्माण झाला असुन इमारतीची तात्काळ डागडुजी करण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.
मोखाडा तालुका कृषी कार्यालयांतर्गत येणार्‍या खोडाळा मंडळ कार्यालयातून परिसरातील 30 हून अधिक गावांतील शेतीविषयक कामकाज तसेच इतरही अनेक विकास कामे केली जातात त्यामूळे येथे शेतकर्‍यांचा मोठ्या प्रमाणावर राबता असतो. त्याचबरोबर शेतीविषयक मार्गदर्शन शिबीरं, बैठका तसेच दैनंदिन कामे करताना भेगा पडलेल्या भिंतीकडे पाहून कर्मचार्‍यांना नैमित्तीक कामांचा निपटारा करावा लागत आहे. मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाची अवस्था अतिशय भयानक झालेली असून भिंतीसह छप्परावरही मोठे झाड उगवलेले आहे. या झाडाच्या मुळ्या थेट भिंत पोखरून कार्यालयात डेरेदाखल झालेल्या आहेत. त्यामूळे इमारतीचा धोका आणखीनच वाढलेला आहे. बांधकाम विभागासह जिल्ह्याच्या वरिष्ठ कार्यालयांनी या धोकादायक इमारतीची व परिसरातील रहिवाशांच्या जीवीताची दखल घेवून इमारतीची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी परिसरातील रहिवाशांनी केलेली आहे.
शासन एकीकडे ठाण्या-मुंबईच्या धोकादायक इमारतींची काळजी घेत असताना दुसरीकडे मात्र ग्रामीण आदिवासींच्या जीवावर उठलेल्या धोकादायक शासकिय इमारती बेदखल ठेवीत आहे, असा आरोप परिसरातील रहिवाशी प्रणिता खैरनार यांनी केला आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top