दिनांक 18 December 2017 वेळ 3:04 AM
Breaking News
You are here: Home » नागरिक पत्रकार » पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या लाचखोर लिपीकाला अटक

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या लाचखोर लिपीकाला अटक

दि. 02 : तिन महिन्यांचा पगार, घरभाडे व दुर्गम भागातील भत्ता थकबाकी बील काढण्यासाठी 7 हजारांची लाच मागणार्‍या पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या लाचखोर लिपीकालाLOGO 4 Online पालघर ऍन्टी करप्शन ब्युरोने रंगेहाथ अटक केली आहे. कैलास जेसा चव्हाण (वय 55) असे अटक करण्यात आलेल्या लिपीकाचे नाव आहे.
अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने थकबाकी असलेला 3 महिन्यांचा पगार, घरभाडे व दुर्गम भागातील भत्ता याबाबतचे बील काढण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या लेखा शाखेत लिपीक पदावर कार्यरत असलेल्या कैलास चव्हाण यांच्याकडे अर्ज केला होता. मात्र चव्हाण यांनी याकामी 7 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने याप्रकरणी ऍन्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार केल्यानंतर 11 व 12 सप्टेंबर रोजी या तक्रारीची पडताळणी करुन व नंतर पोलीस उप अधिक्षक अजय आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचुन ही कारवाई करण्यात आली. यावेळी चव्हाण यांना 7 हजार रुपयांची रक्कम स्विकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली असुन त्यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंध कायद्याचे कलम 7, 13(1)(ड) सह 13(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top