दिनांक 23 January 2018 वेळ 3:22 AM
Breaking News
You are here: Home » संग्राह्य बातम्या » बोईसर : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

बोईसर : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

वार्ताहर BOISAR ACCIDENT
बोईसर, दि. 13 : येथील खैराफाटक उड्डाणपुलावरुन वळण घेत असलेल्या दुचाकीला ट्रकने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात 55 वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असुन विनायक पांडुरंग पिंपळे असे मृत पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. खैराफाटक उड्डाणपुलादरम्यान नेहमीच छोटे मोठे अपघात घडत असल्याने मागील अनेक वर्षांपासुन येथे गतीरोधक बनविण्याची मागणी केली जात आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अपघातात अनेकांचे बळी जात आहेत.
टीडीसी बँकेच्या बोईसर शाखेत कार्यरत असलेले कुंभवली गावातील विनायक पिंपळे हे आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास खैराफाटक येथून बोईसरच्या दिशेने येत असताना उड्डाणपुलावरुन वळण घेत असताना मागून भरधाव वेगात येत असलेल्या ट्रकने त्यांना धडक दिली. यावेळी ट्रकच्या पुढच्या चाकाखाली चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. बोईसर-चिल्हार रस्त्यावर अवजड वाहनांची नेहमीच वर्दळ असते. त्यात पश्‍चिमेकडे उड्डाणपूल संपताच अनेक वाहने गाडीचा वेग कमी करुन बोईसर व पालघरच्या दिशेने वळण घेतात. मात्र येथे गतीरोधक नसल्याने सुस्साट वेगात धावणार्‍या गाड्यांमुळे अपघाताला निमंत्रण मिळते. अशाप्रकारे येथे अनेक अपघात घडल्याने संबंधित विभागाने तातडीने येथे गतीरोधक बनवावे अशी मागणी होत आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top