शिक्षणाचा हक्क देण्यात आपला देश दिडशे वर्षे मागे! ˆ- संजीव जोशी

0
132

शिरिष कोकीळ
डहाणू प्रतिनिधी, दि. 03: बालकांना शिक्षणाचा हक्क देण्यामध्ये आपण दिडशे वर्षे मागे असून जो कायदा ब्रिटनमध्ये 1980 साली आला, त्यासाठी भारतात 2009 साल उजाडावे लागले अशी खंत व्यक्त करुन शिक्षणाचा हक्क व त्यासंबंधातील कायदा याकडे नकारात्मक नजरेने न पहाता हा कायदा अधिक सुदृढ करुन शिक्षणाचा हक्काची प्रभावी अंमलबजावणी करण्याची सामाजिक जबाबदारी आपण पार पाडली पाहीजे असे विचार ज्येष्ठ पत्रकार, तथा पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजीव जोशी यांनी नरपडSHIKSHAN HAKK KAYDA (2) येथे बोलताना काढले. नूतन बाल शिक्षण केंद्र संचालित विकासवाडी अध्यापक विद्यालयाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमीत्त आयोजित कार्यक्रमात ते शिक्षणाचा हक्क कायदा, 2009 या विषयावर बोलत होते. यावेळी व्यासपिठावर नूतन बाल शिक्षण संघाचे अध्यक्ष चंद्रगुप्त पावस्कर, स्नेहवर्धक विश्‍वस्त मंडळाचे अध्यक्ष दिनेश राऊत, विश्‍वस्त जयवंत पाटील, हीरक महोत्सवी समितीचे कार्याध्यक्ष प्रदीप राऊत उपस्थित होते.
डहाणू तालुक्यातील कोसबाड येथील विकासवाडी अध्यापक विद्यालयाची स्थापना होऊन 60 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमीत्ताने हीरक महोत्सवी वर्ष साजरे केले जात असून वर्षभर विविध कार्यक्रम आयोजीत करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून डहाणू तालुक्यातील नरपड येथील स्नेहवर्धक मंडळ संचालित अ. ज. म्हात्रे विद्यालयाच्या सभागृहात शिक्षणाचा हक्क कायदा, 2009 या विषयावरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमास नूतन बाल शिक्षण संघाच्या उपाध्यक्षा संध्या करंदीकर, विश्‍वस्त महेश कारीया, संघाचे सचिव दिनेश पाटील, खजिनदार अशोक पाटील, कार्यकारिणी सदस्य सुधिर कामत, हिरक महोत्सवी समितीचे कार्याध्यक्ष मनोहर सैदाणे, निमंत्रक संतोष लुले, एच. एम. पी. स्कूलचे अध्यक्ष राजेश पारेख व विश्‍वस्त महेश पातानी, अ. ज. म्हात्रे विद्यालयांच्या मुख्याद्यापिका सुजाता राऊत यांसह विविध संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक व शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रदीप राऊत यांनी मनमोहक पद्धतीने विकासवाडी अध्यापक विद्यालयाची व हीरक महोत्सवी वर्षानिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती उपस्थितांना करुन दिली. तसेच संजीव जोशी यांचा परिचय करुन दिला.
जोशी यांनी आपले विचार मांडताना सुरवातीलाच आपण एका पत्रकाराच्या नजरेतून शिक्षणाचा हक्क कायद्याची पार्श्‍वभूमी, कायद्यातील तरतूदी, कायद्याची दिशा व दशा याबाबत आपले विचार मांडणार असल्याचे स्पष्ट करुन स्वातंत्र्यपूर्व काळात 1882 पासून व स्वातंत्र्यानंतरही शिक्षणाच्या हक्काची कशी मागणी होत गेली याचा पट उलगडून दाखवला. भारतातील बालशिक्षणाच्या जनक पद्मभूषण ताराबाई मोडक यांनी शिक्षणाच्या हक्काच्या आग्रहातूनच 1926 साली नूतन बाल शिक्षण संघाची स्थापना केल्याचे सांगून प्रत्यक्षात कायदा अस्तित्वात यायला 2009 साल उजाडले. जगातील 134 देशांनी शिक्षणचा हक्क दिलेला असताना भारत हा देश असा हक्क देणारा 135 वा देश ठरला. म्हणजे जगाने मान्य केलेला शिक्षणाचा हक्क आता भारताने घटनात्मक अधिकार म्हणून मान्य करताना खूपच उशीर झाल्याचे सांगून आता या कायद्यावर टिका करीत आणखी वेळ वाया न घालवता तो अधिक सृदृढ करुन भारत देश घडविण्याची सामाजिक जबाबदारी आपआपल्या परिेने पार पाडू या असे आवाहन जोशी यांनी केले. त्यांनी पुढे असेही सांगितले कि, एखाद्या विद्यार्थ्याला विषयाचे आकलन होत नसेल, आणि तो जर अपयशी ठरला तर ते अपयश त्या विद्यार्थ्याचे, शिक्षकाचे, शाळेचे नसून समाज म्हणून पर्यायाने ते आपले

Print Friendly, PDF & Email

comments