पालघर जिल्हा लेव्हल 3 मधून 2 मध्ये; 14 जूनपासुन निर्बंध शिथिल होणार!

दुकाने नियमितपणे सुरु होणार; मॉल्स, सिनेमागृहे, नाट्यगृहे व रेस्टॉरंट उघडण्यासही परवानगी!

0
3068

पालघर, दि. 11 : जिल्ह्यातील नागरीकांसाठी दिलासादायक बातमी असुन जिल्ह्याचा या आठवड्यातील पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्क्यांपेक्षा खाली व ऑक्सीजन बेड्सची ऑक्युपन्सी 27.66 टक्क्यांवर आल्याने जिल्ह्याचा लेव्हल 3 मधुन लेव्हल 2 मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या 14 जूनपासुन अनेक निर्बंध पूर्णपणे शिथिल होणार असुन यात विशेषत: सर्वच दुकानांचा समावेश आहे.

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आज, 11 जून रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, 14 जूनपासुन खालील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

 • अत्यावश्यक सेवेत असलेली व अत्यावश्यक सेवेत नसलेली अशी सर्वच दुकाने नियमितपणे सुरु ठेवता येणार आहेत.
 • मॉल्स, सिनेमागृहे, नाट्यगृहे व रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
 • सार्वजनिक उद्याने, मैदाने, चालणे व सायकलिंगसाठी ठरवून देण्यात आलेले वेळेचे बंधन देखील मागे घेण्यात आले असुन आता नियमितपणे सुरु राहणार आहे.
 • शासकिय कार्यालयांसह खाजगी आस्थापना व कार्यालये 100 टक्के क्षमतेने नियमितपणे सुरु राहतील.
  *सार्वजनिक वाहतूक 100 टक्के क्षमतेने सुरु होणार. मात्र उभे राहुन प्रवास करता येणार नाही.
 • बाह्य मैदानी खेळ सर्व दिवशी सुरु राहतील. तर इन्डोर खेळ सकाळी 5 ते सकाळी 9 व संध्याकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरु राहतील.
 • सामाजिक, सांस्कृतीक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांना सर्व दिवशी 50 टक्के क्षमतेने परवानगी असेल.
 • विवाह समारंभास 100 व्यक्तींना परवानगी असेल.
 • अंत्यविधीला 50 व्यक्तींना परवानगी असेल.
 • वार्षिक सर्वसाधारण सभांना (स्थानिक संस्था/सहकारी संस्था) हॉलच्या 50 टक्के क्षमतेने लोकांच्या उपस्थितीला परवानगी राहिल.
 • बांधकाम नियमितपणे सुरु राहतील.
 • कृषी संबंधित दुकाने नियमितपणे सुरु राहतील.
 • ई-कॉमर्स नियमितपणे सुरु राहील.
 • जिम, सलुन, ब्यटी पार्लर, स्पा व वेलनेस सेंटर्स 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. परंतू ग्राहकांना पुर्वनियोजित वेळ ठरवूनच यावे लागेल.
 • आंतरजिल्हा प्रवार नियमितपणे सुरु राहील. परंतू 5 व्या स्तरातील जिल्ह्यामध्ये प्रवास करण्यासाठी ई-पास आवश्यक असेल.

Print Friendly, PDF & Email

comments