पालघर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर बंदी

0
1237

पालघर, दि. 10 : पावसाळ्यादरम्यान पर्यटनस्थळांवर होणार्‍या दुर्घटना तसेच अशा ठिकाणी सामाजिक अंतर न पाळल्यास करोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर 8 ऑगस्ट 2021 पर्यंत बंदी घालण्याचे आदेश पालघर अपर जिल्हादंडाधिकार्‍यांनी दिले आहेत.

आदेशात म्हटल्याप्रमाणे, पालघर जिल्ह्यात मान्सून कालावधीत मोठ्या संख्यने पर्यटक धबधबे, तलाव, धरणे व समुद्र किनारी येत असतात व त्याठिकाणी एखादी अप्रिय घटना घडून जीवितहानी होत असते. तसेच सध्यस्थितीत जिल्ह्यात कोव्हीड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, पर्यटनस्थळांवर पर्यटकांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्यास सामाजिक अंतर राखणे शक्य होणार नाही. परिणामी कोव्हीड-19 चा प्रसार व प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पर्यटकांची सुरक्षा अबाधित रहावी व कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण महाजन यांनी हे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

दरम्यान, वसई तालुका वगळता उर्वरित 7 तालुक्यांतील सर्व धबधबे, तलाव, धरणे, समुद्र किनारे, किल्ले आदी पर्यटन स्थळांवर उद्या, 11 जूनपासुन 8 ऑगस्टपर्यंत ही बंदी असणार आहे. तरी नागरीकांनी या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन डॉ. महाजन यांनी केले आहे.

Print Friendly, PDF & Email

comments