जिल्ह्यातील सलुनचालकांना धक्का; दुकान सुरु ठेवण्याची परवानगी रद्द!

0
1136

पालघर, दि. 1 : पालघर जिल्हाधिकार्‍यांनी काल, 31 मे रोजी जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा नसलेली काही दुकाने सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेदरम्यान उघडण्यास सशर्त परवानगी दिली होती. मात्र राज्य शासनाच्या आदेशात सलुन, स्पा व जिम पुर्णपणे बंद ठेवण्याचे नमुद असल्याने पालघर जिल्ह्यातील सलुन उघडण्यास दिलेली परवानगी आता रद्द करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आज याबाबतचे शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले असुन 31 मे रोजीचे सलुन (केश कर्तनालय व दाढी करणे) सुरु ठेवण्यास दिलेली परवानगी रद्द करण्यात येत असल्याचे त्यात म्हटले आहे.

Print Friendly, PDF & Email

comments