दिनांक 23 January 2018 वेळ 3:19 AM
Breaking News
You are here: Home » थोडक्यात महत्वाची बातमी » बोईसर : महावितरण कर्मचार्‍याचा शॉक लागून मृत्यू

बोईसर : महावितरण कर्मचार्‍याचा शॉक लागून मृत्यू

वार्ताहर
बोईसर, दि. 20 : विज महावितरण विभागाच्या निष्काळजीपणामुळे एका कर्मचार्‍याला आपला जिव गमवावा लागला असुन प्रदिप चौहान (40) असे या कर्मचार्‍याचे नाव आहे. गणेcropped-LOGO-4-Online.jpgशोत्सवादरम्यान विज पुरवठा सुरळीत रहावा व नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून शुक्रवारी रात्री बोईसर विभागातील ट्रान्सफार्मर जवळील वाढलेली झाडे झुडपे व वेली काढण्याचे काम करत असताना ही घटना घडली. हे काम करीत असताना सर्व ट्रान्सफार्मरना होणारा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता. मात्र चित्रालय भागातील केयर हॉस्पिटल शेजारी असलेला ट्रान्सफार्म महागाव फिडर उपकेंद्रातून चालवला जात असल्याची कल्पना महावितरणतर्फे देण्यात न आल्याने चौहान येथे काम करीत असताना शेजारील विद्युत वाहिनीच्या संपर्कात आल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का लागला. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यांपासून विजेचा धक्का लागून मृत्यु झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र या संदर्भात विज महावितरण विभागाकडून कोणतीही उपाय योजना केली जात नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top