फळे व भाजीपाल्याची दुकाने शनिवारी व रविवारी सुरु ठेवण्यास परवानगी

स्थानिक शेतकर्‍यांचे नुकसान टाळण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांचा निर्णय!

0
2269

पालघर, दि. 21 : तौत्के चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे नुकसान काही प्रमाणात कमी करण्याच्या उद्देशाने 22 व 23 मे रोजी जिल्ह्यातील स्थानिक शेतकर्‍यांना आपला भाजीपाला व फळे विकण्यास जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे शनिवारी व रविवारी भाजीपाला व फळांची दुकाने सुरु ठेवता येणार आहेत.

करोनाच्या पार्श्‍वभुमीवर राज्यात शनिवारी व रविवारी संपुर्ण लॉकडाऊन राबविण्यात येत आहे. तर इतर पाच दिवस सकाळी 7 ते 11 दरम्यान अत्यावश्यक वस्तुंची दुकाने उघडण्यास परवानगी आहे. अशातच पालघर जिल्ह्याला 17 मे रोजी तौत्के चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने स्थानिक शेतकर्‍यांच्या भाजीपाला व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक तास कोसळलेला अतिमुसळधार पाऊस व वादळी वार्‍यामुळे तयार भाजीपाला तसेच फळं देखील झाडावरुन गळून पडल्याने किमान सडण्यापुर्वीच ते शेतकर्‍यांना विकता यावे व त्यांचे काही प्रमाणात नुकसान कमी व्हावे या हेतून जिल्हाधिकार्‍यांनी हा निर्णय घेतला आहे.

Print Friendly, PDF & Email

comments