दिनांक 18 December 2017 वेळ 3:00 AM
Breaking News
You are here: Home » नागरिक पत्रकार » जागतिक मधमाशीपालन दिनानिमित्त डहाणूत जनजागृती कार्यक्रम

जागतिक मधमाशीपालन दिनानिमित्त डहाणूत जनजागृती कार्यक्रम

शिरीष कोकीळ
डहाणू दि. 20 : जागतिक मधमाशीपालन दिनाचे औचित्य साधून खादी ग्रामोद्योग केंद्र येथे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मधमाशांचे पर्यावरणातील महत्वाचे स्थान, मधमाशी पालनाच्या पद्धती, ती चावल्यास करावयाच्या उपचारपद्धती याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी डहाणू येथील खादी ग्रामोद्योग केंद्राचे प्राचार्य विलास लाडे, विकास अधिकारी सुरेश गायकवाड, तांत्रिक विभागाचे प्रमुख वाय. आर. टिपलं, तांत्रिक अधिकारी (मध) संजय पाटील, कृषी अधिकारी संजय शेंडे, डहाणूच्या उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ए. डी. यादव यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सकाळच्या सत्रामध्ये शाळेचे विद्यार्थी, तालुक्यातील अती दुर्गम भागातील अल्प भूधारक शेतकरी, बेरोजगार युवक यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. या सत्रात वैद्य श्रीमती परितोषींनी कुकडे यांनी वैद्यकीय दृष्ट्या मधाचे महत्व विशद केले. मधमाशा चावल्यानंतर त्यावरील उपायांची सविस्तर माहिती सर्व उपस्थितांना देण्यात आली. संजय पाटील यांनी मधमाशा पालनासाठी वापरण्यात येणारी पेटी, मधमाशा हाताळण्याची पद्धत, त्यातील बारकावे, नैसर्गिक आपत्तीपासून या मधमाशांच्या पेटीचा कसा बचाव करायचा याबाबत प्रात्यक्षिकासह सविस्तर माहिती दिली व उपस्थितांच्या शंकांचे समाधानकारक निरसन केले.
दुपारच्या सत्रामध्ये शासकीय विभागातील अधिकारी, मधमाशा पालन करत असलेले बागायतदार, नवीन व्यवसाय सुरु करू इच्छीणारे शेतकरी, जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मधमाशा पालन उद्योगात येणार्‍या अडचणी, त्यावर करावयाची उपाय योजना याबाबत सविस्तर चर्चा झाली.
वाय. आर टिपल यांनी प्रास्ताविक केले. तर विलास लाडे यांनी स्वतः तयार केलेल्या चित्रफितीद्वारे सादरीकरण केले. सुरेश गायकवाड यांनी मधमाशी पालनाच्या व्यवसायासाठी वित्तीय साहाय्य याबाबतच्या उपलब्धींची माहिती दिली. संजय पाटील यांनी मधमाशी पालन करताना आलेले अनुभव, तिथे येणार्‍या अडचणी, नैसर्गिक आपत्ती, शेतीच्या उत्पनात झालेली घट, निसर्गाचा असमतोल यावरील उपायांना सहाय्यभूत ठरेल अशा मधमाशा पालनाचा जोडधंदा करावा, असे आवाहन केले. आयुर्वेदिक उपचारांमुळे मधाला आपल्या आयुष्यात अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे मधाला चांगली बाजारपेठ देखील उपलब्ध आहे. यामुळे मधमाशा पालनाच्या व्यवसायाला उज्वल भविष्य असून ठाणे आणी पालघर जिल्ह्यातील शेती बागायती, जंगलाखाली येणारे क्षेत्र, पोषक वातावरण याचा विचार करता मधमाशा पालनासाठी आपला परिसर फारच उपयुक्त आहे. त्यामुळे जास्तीजास्त लोकांनी सरकारी योजनांचा फायदा घेऊन या व्यवसायाकडे वळावे, असे कळकळीचे आवाहन देखील पाटील यांनी केले. विनायक बारी यांनी देखील मधमाशी पालनाबाबतचा अनुभव सांगून त्यातील फायदे विशद केले.JAGTIK MADHMASHI PALAN DIN

comments

About Rajtantra

Scroll To Top