दिनांक 23 January 2018 वेळ 3:26 AM
Breaking News
You are here: Home » संग्राह्य बातम्या » मुली शिकल्या तरच समाजाची झपाट्याने प्रगती शक्य! मुंबई विद्यापिठाचे माजी कुलगुरू डॉ. सावंत यांचे मत

मुली शिकल्या तरच समाजाची झपाट्याने प्रगती शक्य! मुंबई विद्यापिठाचे माजी कुलगुरू डॉ. सावंत यांचे मत

प्रतिनिधी :
कुडूस, दि. 20 : मुलींचे शिक्षण महत्वाचे आहे. मुली शिकल्या तरच समाजाची प्रगती होणे शक्य आहे, असे मत मुंबई विद्यापिठाचे माजी कुलगुरू डॉ. अरूण सावंत यांनी मांडले. ते ह. वि. पाटील विद्यालयात कुणबी समाज सेवा निवृत्त कर्मचारी मंडळाच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव कार्यक्रमातुन बोलत होते.
चिंचघर येथील ह. वि. पाटील विद्यालयातील सभागृहात कुणबी समाज सेवा निवृत्त कर्मचारी मंडळ वाडा तालुका व सोक्लीन मित्र मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व गुणवंत विद्यार्थी गौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातुन डॉ. सावंत यांनी समाजाच्या प्रगतीत मुलींच्या शिक्षणाचाही वाटा महत्वाचा असल्KUDUS NEWSयाचे उपस्थितांना पटवून दिले. तसेच पुढे बोलताना सावंत म्हणाले, ह. वि. पाटील विद्यालयाचा परिसर आमचे मंडळ दत्तक घेऊन येथे वृक्षारोपण करणार आहे. लावलेली झाडे चांगल्या प्रकारे वाढवून त्यांचे संगोपन करणार्‍या विद्यार्थ्यांना आमच्या मंडळाकडून शालेय गणवेश, पुस्तके व लेखन साहित्य दिले जाईल, असे सांगतानाच विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांचे ज्ञान असले पाहिजे तसेच कृषी विषयक ज्ञान अवगत असणे गरजेचे आहे. या मंडळाने त्या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीरे आयोजित करावीत. येथील कारखानदारीचा अभ्यास करून प्रदुषित कारखान्याकडून शेतीला हानी होणार नाही, असे नियोजन करावे अथवा अशा कारखानदारीला मज्जाव करावा, असे आवाहन डॉ. सावंत यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमातुन ठाण्याचे माजी निवासी जिल्हा अधिकारी बी. बी. ठाकरे म्हणाले, शेतकर्‍यांनी संघटीतपणे अभ्यासपूर्ण आपले म्हणणे ठणकावून मांडायला शिकले पाहिजे तरच आपल्या समस्या मिटतील. तर सभापती शालीनीताई पाटील यांनी यापुढे या मंडळाच्या कार्यक्रमातुन महिलांचे प्रमाण जास्त असले पाहिजे, अशी सुचना करून आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे आवाहन केले. सोक्लीनचे अवकाश कुमार व संदिप तायडे यांनीही आपले विचार मांडले.
या कार्यक्रमातुन 10 वीच्या परिक्षेत घवघवीत यश मिळवणार्‍या तालुक्यातील सेजल हेमंत बोंन्द्रे (97.80 टक्के), समिक्षा सुजित पाटील (96 टक्के), नेहा विनोद भोईर (94.20 टक्के) व 12 वीच्या परिक्षेत घवघवीत यश मिळवणार्‍या प्रसन्न विनायक सांबरे (98.15 टक्के), कौशल गजानन पाटील (85.85 टक्के), आलीशा संग्राम ठाकरे (84 टक्के) यांच्यासह वाडा तालुक्यातील 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळालेल्या एकूण 15 गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह व रोख रक्कम देवून सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिवाजी पाटील यांनी तर आभार बी. एच. पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नामदेव पाटील, अशोक पाटील, गजानन सावंत, सिताराम पाटील यांनी विशेष मेहनत घेतली.

comments

About Rajtantra

Scroll To Top