पालघर जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांना 75 रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा

0
863

पालघर, दि. 20 : राज्यभरात ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने करोना रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. पालघर जिल्ह्यातही अशाप्रकरचा तुटवटा जाणवत असताना आज आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील 9 खाजगी रुग्णालयांना एकुण 75 रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, विक्रमगडमधील शारदा हॉस्पिटलमध्ये तयार करण्यात आलेल्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये सध्या 11 रुग्णांवर उपचार सुरु असुन येथे 4 रेमडेसिवीर इंजेक्शन, बोईसरमधील थुंगा हॉस्पिटलमध्ये 27 रुग्ण दाखल असुन येथे 9 इंजेक्शन, चिन्मया हॉस्पिटलमध्ये 18 रुग्णांवर उपचार सुरु असुन येथे 6 इंजेक्शन, वरद हॉस्पिटलमध्ये 31 रुग्ण दाखल असुन येथे 11 इंजेक्शन, अधिकारी लाईफलाईन (बेटेगाव) मध्ये 14 रुग्णांवर उपचार सुरु असुन येथे 5 इंजेक्शन, पालघरमधील ढवळे हॉस्पिटलमध्ये 41 रुग्णांवर उपचार सुरु असुन येथे 14 इंजेक्शन, फिलिया हॉस्पिटलमध्ये 22 रुग्णांवर उपचार सुरु असुन येथे 8 इंजेक्शन, डहाणूतील फिनिक्स हॉस्पिटलमध्ये 10 रुग्णांवर उपचार सुरु असुन येथे 3 इंजेक्शन, तर वसई ग्रामीणमधील मदर टेरेसा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 45 रुग्णांवर उपचार सुरु असुन येथे 15 रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला आहे.

Print Friendly, PDF & Email

comments