बोईसर : पत्नीचा खून करुन पतीची रेल्वेखाली आत्महत्या; पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून होत होते दोघांमध्ये वाद!

0
1282
प्रतिकात्मक छायाचित्र

बोईसर, दि. 11 : पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून उद्भवलेल्या वादातून पतीने पत्नीची चाकूने खुपसून हत्या केल्याची व नंतर स्वत: रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना बोईसरमधील सरावली भागात घडली आहे. 9 मार्च रोजी ही घटना घडली असुन महेंद्र यादव असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोईसरमधील सरावली भागात राहणार्‍या महेंद्र यादव या इसमाची पत्नी त्याचे इतर महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत होती. यातून दोघांमध्ये नेहमी वाद होत होते. मंगळवार, 9 मार्च रोजी देखील यावरुन दोघांमध्ये वाद झाला व संतापलेल्या महेंद्रने पत्नीची चाकूने खुपसून हत्या केली. यानंतर त्याने थेट बोईसर रेल्वे रुळ गाठत धावत्या ट्रेनसमोर येऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असुन पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या घटनेची बोईसर पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली असुन अधिक तपास सुरु आहे.

दरम्यान, यापुर्वी वाणगाव येथे प्रेयसीची हत्या करुन मृतदेह भिंतीत गाडल्याची, बोईसरमधील पास्थळ येथील एका महिलेची व तिच्या मुलीची हत्या करुन पती फरार झाल्याची व नुकतीच मनोर येथे अनैतिक संबंधात पती अडथळा ठरत असल्याने प्रियकराच्या साथीने त्याची हत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते.

Print Friendly, PDF & Email

comments